सार्वभौम सुवर्ण रोख्यांची अर्थात ‘सॉव्हरिन गोल्ड बाँड’मध्ये गुंतवणूक करण्याची ‘सुवर्ण’संधी आजपासून (ता. ९ ऑगस्ट) पुन्हा उपलब्ध होत आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी सार्वभौम सुवर्ण रोख्यांची पाचवी मालिका जाहीर केली आहे. विशेष म्हणजे चौथ्या मालिकेपेक्षा थोड्या कमी किमतीत हे सुवर्ण रोखे खरेदी करता येणार आहेत. हे रोखे स्मॉल फायनान्स बँका व पेमेंट बँका वगळता, इतर सर्व शेड्यूल कमर्शिअल बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, निवडक टपाल कार्यालये; तसेच विविध ब्रोकिंग कंपन्यांच्या मार्फत खरेदी करता येतात.
इश्यू सुरू होण्याची तारीख - ९ ऑगस्ट २०२१
इश्यू बंद होण्याची तारीख - १३ ऑगस्ट २०२१
किमान गुंतवणूक - एक ग्रॅम
कमाल गुंतवणूक - चार किलो
प्रतिग्रॅम किंमत - रु. ४७९०
डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी किंमत - रु. ४७४०
सुवर्ण रोख्यांचा कालावधी - ८ वर्षे
इश्यू किमतीवर वार्षिक व्याज - २.५० टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.