यंदा 'या' सेक्टर्समध्ये चांगली वाढ, म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला

Mutual Fund Investment Tips in Marathi
Mutual Fund Investment Tips in MarathiSakal
Updated on

शेअर बाजारातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अशा परिस्थितीत लोक थोडे अस्वस्थ दिसत आहेत. अनेक गुंतवणूकदारांना समजत नाही की काय करावे? अशा सगळ्या गोंधळात पडलेल्या गुंतवणुकदारांसाठी तज्ज्ञांनी खास सल्ला दिला आहे. हे वर्ष जोखमीचे असणार आहे, त्यामुळे अशा स्थितीत कॅपिटल प्रोटेक्शनचा विचार करून पावले उचलली पाहिजेत असे तज्ज्ञ सांगत आहेत.

Mutual Fund Investment Tips in Marathi
Pan Card Update: लग्नानंतर लवकरात लवकर करा पॅन अपडेट अन्यथा...

'वाढ निवडक सेक्टर्समध्येच दिसेल'


2022 या वर्षाची गेल्या दोन वर्षांच्या परताव्याशी तुलना करू नका असे तज्ज्ञ सांगत आहेत. साधारणपणे 6 वर्षांसाठी बाजार सकारात्मक परतावा देतो, पण सातव्या वर्षी त्यात घसरण दिसते. अशा परिस्थितीत काही निवडक क्षेत्रांमध्येच चांगली वाढ दिसून येईल. त्यामुळे अशा पैशांची बचत करण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. गुंतवणुकदारांनी जर त्या निवडक सेक्टर्समध्ये पैसे गुंतवले असतील तर ते नक्की नफा कमावतील, अन्यथा त्यांना नुकसान सहन करावे लागेल.

घसरणीनंतर व्हॅल्युएशन लाँग टर्म एव्हरेजपर्यंत खाली येत आहे. ते 19 च्या पीईवर पोहोचत आहे. हे बाजारातील गुंतवणूकदारांना आकर्षित करते. लोकांनी थोड्या काळासाठी म्हणजे काही महिन्यांसाठी गुंतवणूक करू नये. 2-3 किंवा 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर बरे होईल. सगळ्यात महत्त्वाचे आहे की आपण हुशारीने पैसे गुंतवणे. म्हणजेच गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवण्यापेक्षा बचत करण्यावर भर द्यावा.

Mutual Fund Investment Tips in Marathi
गुरूवारी शेअर बाजारात घसरण, आज कशी असेल स्थिती?

गुंतवणूकदारांनी आता काय करावे?


सध्याची घसरण लाँग टर्म गुंतवणूकदारांसाठी संधीसारखी आहे. यंदा बाजारात प्रचंड अस्थिरता असेल. दुसरीकडे, कमोडिटीजध्ये तेजी आहे. त्यामुळे व्याजदर वाढू शकतात. थोड्या - थोड्या काळावधीनंतर पैसे गुंतवा. त्याचे रिटर्न्स कदाचित 2-3 वर्षांनी दिसून येतील असे तज्ज्ञ सांगत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()