मुंबई : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजना चालवण्यामागचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हा आहे. तसेच सरकार शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये पाठवते. यासह, आता सरकार पीएम किसान योजनेशी संबंधित शेतकऱ्यांना पीएम किसान मानधन योजनेशी जोडत आहे, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
पीएम किसान मानधन योजनेंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना वार्षिक पेन्शनच्या रूपात ३६ हजार रुपयांची आर्थिक मदत देते. आता यानुसार दोन्ही योजना एकत्र करून सरकार शेतकऱ्यांना वार्षिक ४२ हजार रुपयांची आर्थिक मदत देते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून वार्षिक ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात दर ४ महिन्यांनी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांच्या स्वरूपात दिले जातात.
पीएम किसान मानधन योजना सुरू केल्यावर, तुम्हाला दरमहा फक्त ५५ ते २०० रुपये जमा करावे लागतील आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर सरकार तुम्हाला वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शन देईल.
पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. पीएम किसान मानधन योजनेसाठी, प्रथम तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल.
त्याच वेळी, या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. ज्यामध्ये लाभार्थीचा मध्यंतरी मृत्यू झाल्यास ५० टक्के पेन्शन जोडीदाराला दिली जाते.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हप्ते जमा झाले आहेत. आता सर्व शेतकरी त्याचा १२वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. खात्यात १२वा हप्ता लवकरच येऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.