रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी आहे. तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर तुम्हाला गॅस सिलेंडर फक्त 500 रुपयांना मिळेल. दररोज वाढत असलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीपासून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
गॅस सिलिंडरची किंमत 1,000 रुपयांच्या पुढे गेली आहे. रेशनकार्ड दाखवून तुम्हाला अर्ध्या किंमतीतच सिलेंडर मिळेल.
लाभ कोणाला मिळणार?
राजस्थान सरकारने गॅस सिलेंडर निम्म्या किंमतीत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाची संपूर्ण राज्यात एप्रिल 2023 पासून अंमलबजावणी होणार आहे. बीपीएल कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
दरवर्षी 12 सिलिंडर :
उज्ज्वला योजने अंतर्गत सरकार 12 सिलिंडरची सुविधा देते. आता तुम्हाला फक्त 500 रुपये मध्ये सिलेंडर मिळणार आहे. पुढील महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार असून, त्यात केंद्र आणि राज्य सरकार महागाईचा भार कमी करण्यासाठी विशेष योजना आखत आहेत.
हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?
राज्यात यंदा विधानसभा निवडणुका होणार असून, त्यामुळे विकासकामांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत जोरदार तयारी करत आहेत.
यामध्ये गरिबांना आकर्षित करण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत. या योजनेंतर्गत सरकार 12 सिलेंडरचे वितरण करणार आहे, याचा गरीब आणि गरजूंना मोठा फायदा होणार आहे.
1 जानेवारीलाही सिलिंडरचे दर वाढले
1 जानेवारी 2023 पासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती कायम आहेत. व्यावसायिक सिलिंडरसाठी 25 रुपये अधिक खर्च केले जातील.
घरगुती सिलिंडरचे दर :
दिल्ली - 1053
मुंबई - 1052.5
कोलकाता - 1079
चेन्नई - 1068.5
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.