Google ठरला सर्वाधिक आकर्षक 'एंप्लॉयर ब्रँड'

जेथे कंपनी ब्रँड निवडताना आर्थिक नुकसान भरपाईइतकेच काम आणि आयुष्यामधील संतुलन महत्त्वपूर्ण बनले आहे
google
googlegoogle
Updated on

नवी दिल्ली: तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी गुगल इंडिया (Google India) ही सर्वाधिक आकर्षक 'एंप्लॉयर ब्रँड' म्हणून समोर आली आहे. त्यानंतर अॅमेझॉन इंडिया (Amazon India) आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया (Microsoft India) यांचा नंबर लागतो. ही माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. Randstad एप्लॉयर ब्रँड रिसर्च (REBR) 2021 च्या सर्वेक्षणानुसार, गुगल इंडिया ही चांगला पगार, प्रतिष्ठेच्या आयामामध्ये प्रथम राहिली आहे. तर दुसऱ्या स्थानी अॅमेझॉन इंडिया आणि नंतर मायक्रोसॉफ्ट इंडियाचा नंबर लागतो.

इन्फोसिस, TCS, टाटा स्टीलचाही समावेश-

2021 मधील टॉप टेन आकर्षक एंप्लॉयर ब्रँडच्या यादीत इन्फोसिस चौथ्या स्थानावर, टाटा स्टील पाचव्या क्रमांकावर तर डेल टेक्नॉलॉजीज लिमिटेड सहाव्या, IBM सातव्या, TCS आठव्या, विप्रो नवव्या, आणि सोनी दहाव्या स्थानावर आहे. यासह, या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की यावर्षी देखील कर्मचार्‍यांच्या वृत्तीत बदल दिसून आला आहे, जेथे कंपनी ब्रँड निवडताना आर्थिक नुकसान भरपाईइतकेच काम आणि आयुष्यामधील संतुलन महत्त्वपूर्ण बनले आहे.

google
RIL कंपनी ADNOC सोबतच्या करारानंतर गुंतवणार दीड अब्ज डॉलर?

Randstad च्या संशोधनात, 1 लाख 90 हजार पेक्षा जास्त लोकांची मते घेण्यात आली आहेत, जे 18 ते 65 वर्षे वयोगटातील सामान्य नागरिक आहेत. तर 34 देशांतील 6 हजार 493 कंपन्यांचा समावेश होता. कंपनी निवडताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणून कामातील आयुष्यातील संतुलन ( 65 टक्के) आकर्षक पगार आणि फायदे (62 टक्के) यांना मागे टाकले. तर जॉब सेक्यूरिटी (61 टक्के) दिसून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()