स्मार्ट माहिती : ‘टाटां’च्या तबेल्यातील उमदे घोडे

टाटा समूहाचे आणि त्यातील कंपन्यांचे नाव माहिती नसणारा विरळाच आणि रतन टाटांचे नाव ऐकल्याबरोबर कानाच्या पाळीला हात लावणारे बरेच आहेत.
Tata Group
Tata GroupSakal
Updated on

टाटा समूहाचे आणि त्यातील कंपन्यांचे नाव माहिती नसणारा विरळाच आणि रतन टाटांचे नाव ऐकल्याबरोबर कानाच्या पाळीला हात लावणारे बरेच आहेत. अशा या नामवंत समूहातील कंपन्यांच्या शेअरमधे बऱ्याच गुंतवणूकदाराची गुंतवणूक असते. त्यातल्या त्यात ‘टीसीएस’ म्हणजे तर टाटा समूहातील उमदा घोडा!

एरवी गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमधील सर्वच शेअर फायदा देत नसतात. साधारण १० शेअरमध्ये ५-६ शेअरच फायदा दर्शवित असतात. तसेच टाटा समूहातील सर्वच कंपन्या फायद्यात आहेत, असे नाही. टाटा सन्स ही मुख्य कंपनी आहे. तिच्या अधिपत्याखाली पुढील कंपन्या येतात : (कंसात सहा ऑगस्ट २०२१ चा भाव)

टीसीएस (रु. ३३१०), टाटा स्टील (रु. १४२८), टाटा कम्युनिकेन्स (रु. १४८२), टाटा कन्झुमर प्रॉडक्टस (रु. ७८१), टायटन (रु. १७९०), व्होल्टाज (रु. १०४८), टाटा पॉवर (रु. १३५), टाटा एलेक्झी (रु. ४२३४), नेल्को (रु. ३६९), टाटा मोटर्स (रु. ३००), ट्रेंट (रु. ९१६), इंडियन हॉटेल (रु. १४५).

यावरून असे दिसून येईल, की ‘टीसीएस’ ही कंपनी टाटा समूहाचा भार प्रामुख्याने वाहात आहे... फायद्याचा आणि ‘कॅश फ्लो’चा!अलीकडच्या काही वर्षांपूर्वी चंद्रशेखरन यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून टाटा समूहातील इतर कंपन्या देखील सुधारणांच्या मार्गावर आहेत. त्यामुळे टाटांच्या तबेल्यातील चांगले उमदे घोडे आपल्याकडे पण असायला हवेत.

टाटा समूहातील कंपन्यांची कामगिरी

तपशील २०२० २०२१

रु. कोटी फायदा (तोटा)

१) सर्व लिस्टेड कंपन्या (टीसीएस सोडून) (२९९६) (३४०५)

२) सर्व लिस्टेड कंपन्या (टीसीएस धरून) २९,३४४ २९,०२५

३) फक्त ‘टीसीएस’ ३२,४४७ ३२,४३०

(लेखक शेअर बाजाराचे जाणकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.