स्मार्ट माहिती : मी कात टाकली... टाटा मोटर्स!

दसऱ्याचा दिवस. शेखरच्या घरासमोर नवी कोरी ‘टाटा टियागो’ मोठ्या दिमाखाने उभी होती. हार घालून नारळ फोडून शेखर आपल्या आई-वडिलांना फिरवून आणणार होता.
tata motors
tata motorssakal media
Updated on

दसऱ्याचा दिवस. शेखरच्या घरासमोर नवी कोरी ‘टाटा टियागो’ मोठ्या दिमाखाने उभी होती. हार घालून नारळ फोडून शेखर आपल्या आई-वडिलांना फिरवून आणणार होता. वडिलांच्या सांगण्यावरुन त्याने दोन वर्षांपासून ‘टाटा मोटर्स’चे शेअर घ्यायला सुरवात केली होती आणि गाडी घ्यायची तर या गुंतवणुकीमधूनच, असे ठरवून आज गाडीचे आगमन झाले होते. ‘टाटा मोटर्स’प्रमाणेच अनेक कंपन्या आपल्या शेअरच्या किमतीतून गुंतवणूकदारांना त्यांच्या पसंतीच्या गोष्टी घेण्याचा विचार करायला लावत आहेत. यासाठी गुंतवणूकदारांनी मानसिकता बदलायची गरज आहे.

१९४५ मध्ये स्थापन झालेल्या टाटा मोटर्स या कंपनीने आपल्या ७६ व्या वर्षी कात टाकायला सुरवात केली आहे. अमेरिकन टीपीजी आणि अबुधाबी एडिक्यू या कंपनीच्या सहकार्याने इलेक्ट्रीसिटीवर चालणाऱ्या मोटारी आता ‘टाटा मोटर्स’ बनविणार आहे. त्यासाठी टाटा पॅसेंजर कार्स विभाग मुख्य कंपनीपासून वेगळा करण्यात आला आहे. ही नवी ईव्ही कंपनी फी च्या बदल्यात फक्त तंत्रज्ञान पुरविणर आहे. टीपीजी आणि एडिक्यू कंपन्या ७५०० कोटी रुपयांचे परदेशी भांडवल पुरविणार आहेत. याच्या बदल्यात त्यांना कम्पल्सरी कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर देण्यात येणार आहेत. यामुळे टीपीजी आणि एडिक्यू यांना नंतर ईव्ही कंपनीच्या भागभांडवलात ११.५ टक्के हिस्सा मिळणार आहे. या दोन्ही कंपन्यांकडून २०२२ अखेरपर्यंत परकी भांडवल येणार आहे.

अशा पद्धतीने कात टाकून येणाऱ्या या नव्या ‘टाटा मोटर्स’चे गुंतवणूकदार स्वागतच करतील!

(लेखक शेअर बाजाराचे ज्येष्ठ अभ्यासक आणि जाणकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.