सकाळ प्रकाशित 'गोष्ट पैशापाण्याची' अख्ख्या भारतामध्ये पुन्हा एकदा ठरले #1 बेस्टसेलर

सकाळ प्रकाशनाचे 'गोष्ट पैशापाण्याची' हे पुस्तक आता 4 महीने गाजत आहे.
गोष्ट पैशापाण्याची
गोष्ट पैशापाण्याचीsakal
Updated on

गोष्ट पैशापाण्याची हे प्रफुल्ल वानखेडे लिखित आणि सकाळ प्रकाशित पुस्तक सर्व पुस्तकांमध्ये, सर्व भाषांमध्ये, सर्व श्रेणीमध्ये पुन्हा एकदा भारतामध्ये #1 बेस्टसेलर आहे. कोणत्याही प्रादेशिक भाषेतील हिंदी भाषेतील पुस्तकांसाठी आणि विशेषतः मराठीसाठी ही एक दुर्मिळ कामगिरी असेल. लक्षात घेता इंग्रजी पुस्तकांच्या बाजारपेठेचा आकार मराठीच्या 15 पट मोठा आहे.

सकाळ प्रकाशनाचे 'गोष्ट पैशापाण्याची' हे पुस्तक आता 4 महीने गाजत आहे. पुस्तकाच्या निर्मितीपासून सुरू असलेली वाचकांच्या मागणीची ही घोडदौड पुस्तकाने कायम ठेवली आहे. 'गोष्ट पैशापाण्याची' हे खपाचे नव नवे विक्रम प्रस्थापित करत आता 1 लाख प्रतींकडे वाटचाल सुरू आहे. अवघ्या चार महिन्यात या पुस्तकाच्या ६० हजार प्रतींची विक्री झाली आहे. तिसरी आवृत्ती ४० हजार प्रतींची लवकरच बाजारात येत आहे.

ह्या पुस्तकाचे लेखक, प्रफुल्ल वानखेडे हे उद्योजक आहेत आणि औष्णिक उर्जा क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचबरोबर ते अनेक कंपन्यांचे संस्थांपक-अध्यक्ष आणि पुस्तकप्रेमी आहेत. त्यांच्या 'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकाने अल्पवधीतच खपाचा विक्रम केला. अनेक तरुणांनी हे पुस्तक आपल्याला यापूर्वीच मिळाले असते तर आणखी प्रगती केली असती, असा अभिप्राय दिला. जीवनाचे आणि पैशाचे व्यवस्थापन कसे करावे, या विषयी हे पुस्तक मित्र बनून मार्गदर्शन करते, असा अनुभव अनेकांनी व्यक्त केला.

आपल्यापैकी प्रत्येक जण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी धडपडत असतो. भरपूर पैसे कमविण्याबरोबरच जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर यशाची वाटचाल सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नांना आकार देण्यासाठी आणि जीवनातील मूल्ये कमविण्यासाठी प्रफुल्ल वानखेडे यांनी केलेले मार्गदर्शन मौल्यवान ठरणारे आहे. त्यासाठी गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरणारे आहे.

समाजमाध्यमांवरील बोलक्या प्रतिक्रिया

तुमच्या आर्थिक साक्षरता या विषयावरील लेखामुळे माझ्या मुलीच्या वाढदिवसावर होणारा वारेमाप खर्च मी कमी केला. हौस आणि गरज यातील अंतर आता मला समजले आहे.

- सचिन सुरवसे, मुंबई

या पुस्तकामुळे खूप काही शिकायला मिळाले आहे. तीच्या हाती अर्थसाक्षरतेची दोरी आणि सुरक्षाकवच या लेखांनी माझे जीवन बदलले आहे.

- राहुल मोरे, पुणे

हे पुस्तक म्हणजे सरस्वतीने लक्ष्मीची आराधना शिकविण्यासारखे जणू!

- तेजस कुमठे

पुस्तक खरेदीसाठी या लिंकला फाॅलो करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.