Investment Tips : ‘या’ सरकारी कंपन्या देतात बँक एफडी (FD) पेक्षा जास्त लाभांश

लाभांश देणारे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जास्त उत्पन्न मिळवून देतात.
Investment
Investmentsakal
Updated on

लाभांश देणारे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जास्त उत्पन्न मिळवून देतात. अलीकडेच, सरकारी मालकीची कंपनी Rural Electrification Corporation Limited  (REC Limited) लिमिटेडने आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रति शेअरसाठी 5 रुपये लाभांश जाहीर केला आहे. (REC Limited) चा शेअर गुरुवारी 96.50 रुपयांवर बंद झाला. कंपनीचा लाभांश उत्पन्न 5% पेक्षा जास्त आहे. जर आपण  (REC Limited) लिमिटेडच्या वार्षिक लाभांश उत्पन्नावर नजर टाकली तर, कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये प्रति शेअर 13.30 रुपये लाभांश दिला आहे. जो बँक मुदत ठेवींच्या (FD) सरासरी व्याजदरांपेक्षा सुमारे 6% ने जास्त आहे.

Investment
Investment Tips : ज्येष्ठ नागरिकांनी ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मिळेल जास्त परतावा

खालील कंपन्यांचे शेअर्स तुम्हाला बँक एफडी दरांपेक्षा जास्त परतावा देतात.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL)

सरकारी मालकीची स्टील कंपनी (SAIL) ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये प्रति शेअर 8.75 रुपये लाभांश दिला आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये तीनदा लाभांश दिला आहे. कंपनीने नोव्हेंबर 2011 मध्ये 4 रुपये, मार्च 2022 मध्ये 2.50 रुपये आणि 2.35 रुपये लाभांश दिला आहे. नवरत्न कंपन्यांचे शेअर्स सध्या 82 रुपयांच्या आसपास आहेत.

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (PFC)

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) या सरकारी कंपनीने 2021-22 या आर्थिक वर्षात प्रति शेअर 12.25 रुपये लाभांश दिला आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना (Share Holders) चार वेळा लाभांश दिला आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) ने ऑगस्ट 2021, नोव्हेंबर 2021 आणि फेब्रुवारी 2022 साठी अनुक्रमे 2.50 रुपये, 2.50 रुपये आणि 6 रुपये लाभांश दिला आहे. पीएफसी कंपनीच्या प्रती शेअरची किंमत सध्या 110 रुपयांवर आहे.

Investment
Exchange Notes : तुमच्याकडेही फाटलेल्या नोटा आहेत का? ‘अशा’ बदलता येतील नोटा

कोल इंडिया लिमिटेड (CIL)

सरकारी कंपनीने आर्थिक वर्ष 2022 मध्ये त्यांच्या भागधारकांना प्रति शेअर 17 रुपये लाभांश दिला आहे. कोल इंडियाने डिसेंबर 2021 आणि फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांच्या भागधारकांना (Share Holders)  अनुक्रमे 9 रुपये आणि 5 रुपये अंतरिम लाभांश दिला आहे. यानंतर, कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये प्रति शेअर 3 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला. कोल इंडिया लिमिटेडचे  (CIL) शेअर्स सध्या 240 रुपयांच्या जवळ आहेत. याचा अर्थ त्याचा वार्षिक लाभांश 7% पेक्षा जास्त आहे. सध्या कंपनी बँक एफडीपेक्षा जास्त परतावा देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.