GST Return : जीएसटी करदात्यांना सरकारने दिला दिलासा; आज रात्रीपर्यंत रिटर्न भरण्यासाठी वेळ

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) वतीने ट्विट करून शेवटची तारीख वाढवण्याबाबत माहिती देण्यात आली.
GST annual return
GST annual returneskal
Updated on

सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत एका दिवसाने वाढवून २१ ऑक्टोबर केली आहे. करदात्यांनी फाइलिंग दरम्यान जीएसटी पोर्टलच्या चुकीबद्दल तक्रार केली होती. दर महिन्याची २० तारीख ही मासिक GST रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) वतीने ट्विट करून शेवटची तारीख वाढवण्याबाबत माहिती देण्यात आली. CBIC ने लिहिले की GST परिषदेने सप्टेंबर २०२२ साठी मासिक रिटर्न भरण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मासिक रिटर्न आणि कर भरणा फॉर्म GSTR-3B वेगवेगळ्या राज्यांतील करदात्यांनी दर महिन्याच्या २०, २२ आणि २४ तारखेदरम्यान दाखल केला आहे. GST नेटवर्क (GSTN) वस्तू आणि सेवा कर (GST) चालवण्यासाठी तंत्रज्ञान बॅकएंड प्रदान करते.

GST annual return
कर्जबाजारी अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलची विभागणी; कंपनीचे चार भागात होणार विभाजन

सप्टेंबर महिन्यातील जीएसटी संकलन ऑगस्टच्या तुलनेत जास्त होण्याची शक्यता आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) एकूण संकलन सुमारे १.४४ लाख कोटी रुपये झाले आहे. ऑगस्टमधील एकूण जीएसटी संकलनामध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) चे योगदान २४,७१० कोटी रुपये आहे, तर राज्य जीएसटी (एसजीएसटी) ३०,९५१ कोटी रुपये आहे. गेल्या 6 महिन्यांपासून जीएसटी संकलनाचा आकडा 1.4 लाख कोटी रुपयांच्या वर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.