GST and ITR Filing : आयकर रिटर्न आणि जीएसटी भरण्याची शेवटची संधी; व्यावसायिकांनी...

करदात्यांनी जीएसटी आणि आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढवण्याची मागणी केली आहे.
Income Tax Return
Income Tax Returnsakal
Updated on

ITR and GST filing Deadline :  GST वार्षिक रिटर्न आणि ITR भरण्याची शेवटची तारीख आज आहे. यावर्षी टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे, असे असतानाही काही आयकरदात्यांनी जीएसटी आणि आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढवण्याची मागणी केली आहे.

आज 31 डिसेंबर 2022 ही व्यावसायिकांना 2021-22 या आर्थिक वर्षासाठी GST वार्षिक रिटर्न भरण्याची शेवटची संधी आहे.

2021-22 या आर्थिक वर्षात 5 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपन्यांनी GSTR-9 फॉर्म आणि GSTR 9C फॉर्म दाखल करणे अपेक्षित आहे. फॉर्म भरायला उशीर झाल्यास तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल.

जर करदात्याने मूळ विवरणपत्र आधीच भरले असेल, तर त्याला विलंब शुल्कासह विलंबित आयकर विवरणपत्र सादर करावे लागेल.

सुधारित आयकर रिटर्न हे विलंबित रिटर्नपेक्षा वेगळे असते. ज्या आयकरदात्यांनी मूळ विवरणपत्र भरले आहे ते कोणत्याही विलंब शुल्काशिवाय सुधारित आयकर विवरणपत्र सादर करू शकतात.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

या वर्षी 25 डिसेंबरपर्यंत 2022-23 च्या मूल्यांकन वर्षासाठी 7 कोटी 14 लाख लोकांनी आयकर रिटर्न भरले आहेत. त्यापैकी 6 कोटी 49 लाख आयकरदात्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

जीएसटी आणि आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढवण्याची मागणी :

काही टॅक्स प्रॅक्टिशनर्स आणि व्यावसायिकांनी रिटर्न भरण्याची मुदत किमान एक ते तीन महिन्यांनी वाढवण्याची मागणी केली आहे.

Income Tax Return
Ratan Tata : ज्यांनी खिल्ली उडवली, त्यांनाच लावलं कामाला; टाटांचा पॅटर्नच वेगळा

मेरठ टॅक्स बार असोसिएशनने अर्थ मंत्रालयाला पत्र लिहून GSTR 9, GSTR 9C आणि ऑडिट नसलेल्या श्रेणीतील व्यावसायिकांसाठी आयकर रिटर्न भरण्याची सध्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.