GST: नव्या वर्षाची धमाकेदार सुरूवात जानेवारी 1.56 लाख कोटींचा GST जमा

आत्तापर्यत या दोन वर्षात सर्वात जास्त जीएसटी जमा
GST Collection in January 2023
GST Collection in January 2023esakal
Updated on

2023च्या जानेवारी महिन्यात 1,55,922 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिली आहे. तर एप्रिल 2022 मध्‍ये 1.68 लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. आत्तापर्यत या दोन वर्षात सर्वात जास्त जीएसटी जमा झाला आहे.

GST Collection in January 2023
Union Budget 2023: गुडन्यूज, आयकरात मोठा बदल होण्याची शक्यता

अर्थ मंत्रालयाने जाहिर केलेल्या नोट नुसार, 31 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1,55,922 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. यामध्ये 28,963 कोटी रुपये CGST म्हणून जमा झाला. याशिवाय 36,730 कोटी रुपये SGST आणि 79,599 कोटी रुपये IGST म्हणून जमा झाला आहे.

GST Collection in January 2023
Budget 2023: विकास किंचित मंदावणार

IGSTच्या रकमेत, वस्तूंच्या आयातीवर कर म्हणून 37,118 कोटी रुपये जमा झाले. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 10630 कोटी रुपये उपकर म्हणून जमा झाला. यामध्ये मालाच्या आयातीवर अधिभार म्हणून 768 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.