Auto Stock : गुजरातमधील ही ऑटो कंपनी चर्चेत, 6 महिन्यात चक्क 109% रिटर्न

ही गुजरातमधील प्रतिष्ठित तीन चाकी वाहन उत्पादक कंपनी आहे.
Auto Stock
Auto Stock sakal
Updated on

Auto Stock : अतुल ऑटोच्या शेअर्समध्ये गुरुवारी बीएसई\वर 364 रुपयांच्या तीन वर्षांच्या उच्चांकावर इंट्राडेमध्ये 7 टक्क्यांची वाढ दिसून आली. कंपनीने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात उतरण्याची घोषणा केल्यानंतर, गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या स्टॉकमध्ये 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अतुल ऑटोची सब्सिडियरी अतुल ग्रीनटेक प्रायव्हेट लिमिटेडने (AGPL) 11 जानेवारीला नवी दिल्लीत ऑटो एक्स्पो 2023 मध्ये अतुल मोबिली आणि अतुल एनर्जी या दोन इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर लाँच करून इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. (gujarat atul Auto company Stock have given best return in share market)

अतुल ऑटो ही गुजरातमधील प्रतिष्ठित तीन चाकी वाहन उत्पादक कंपनी आहे. अतुल मोबिली हे प्रवासी वाहन आहे आणि अतुल एनर्जी हा कार्गो व्हेरिएंट आहे.  इलेक्ट्रिक थ्री व्हीलर अतुल ऑटोसाठी नवीन युगाची सुरुवात आहे. अतुल मोबिली आणि अतुल एनर्जी हे लीडिंग टेक्नोलॉजी, टेलिमॅटिक्स आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमसह (BMS) तयार केले गेल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

गेल्या सहा महिन्यांत हा स्टॉक मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. अतुल ऑटोने या कालावधीत 109 टक्के मजबूत परतावा दिला आहे. त्याच वेळी, एका वर्षात 78 टक्के आणि 2023 मध्ये 24 टक्के परतावा दिला आहे.

Auto Stock
Auto Expo Pune: २१ ब्रँड एकाच छताखाली आले, नागरिक काय म्हणाले?

एजीपीएल अर्थात अतुल ग्रीनटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी इलेक्ट्रिक वाहने, ऑटोमोबाईल, एनर्जी स्टोरेज आणि टेलिमॅटिक्ससाठी सोल्यूशन्स सारख्या विविध ऍप्लिकेशन्ससाठी लिथियम आयन बॅटरीच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-डिसेंबरमध्ये अतुल ऑटोने वार्षिक 57.1 टक्क्यांच्या वाढीसह 18,065 युनिट्सची विक्री केली. एका वर्षापूर्वी याच कालावधीत कंपनीने 11,499 मोटारींची विक्री केली होती.

Auto Stock
Auto Expo 2023 : आता पाय घासत गाडी चालवण्याची गरज नाही, ही ईव्ही स्कूटर बनणार वृद्धांचा आधार

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.