Best Life Insurance Plans : तुम्ही अजून विमा उतरवला नाहीये? जाणून घ्या कोणती पॉलिसी तुमच्यासाठी परफेक्ट आहे?

प्रत्येका व्यक्तीने आपल्या आयुष्यात विमा पॉलिसी काढणं गरजेचं आहे...
Best Life Insurance Plans
Best Life Insurance Plansesakal
Updated on

Best Life Insurance Plans: प्रत्येका व्यक्तीने आपल्या आयुष्यात विमा पॉलिसी काढणं गरजेचं आहे, याचे अनेक फायदे आहेत जे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला अडचणीच्या वेळी मदत करतात पण सध्या बाजारात अनेक प्रकारच्या विमा पॉलिसी आल्या आहेत पण आपल्यासाठी नक्की कोणती चांगली?

विमा पॉलिसी प्रामुख्याने दोन प्रकारच्या असतात. एक व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना मदत करते आणि दुसरी व्यक्ती जीवंत असतांना संरक्षण देत लाभ मिळवून देते. प्रत्येक प्रकारात वेगवेगळ्या योजना आहेत आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची योजना हवी आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. जाणून घेऊया याचे प्रकार...

Best Life Insurance Plans
Medical Insurance : वैद्यकीय विमा असूनही औषधांसाठी करावा लागणार मोठा खर्च

टर्म प्लॅन योजना

ही योजना 10, 20 किंवा 30 वर्षांच्या निश्चित मुदतीसाठी खरेदी केली जाऊ शकते. या योजनेत निवडलेल्या कालावधीसाठी कव्हरेज उपलब्ध आहे. टर्म इन्शुरन्स प्लॅन अंतर्गत भविष्यात तुम्हाला काही झाले तर त्यामुळे तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते.

व्यक्तीला आर्थिक संरक्षण देण्याचा हा एक सोपा आणि किफायतशीर मार्ग मानला जातो. टर्म इन्शुरन्स ही संपूर्ण संरक्षण योजना आहे आणि ती बाजाराशी जोडलेली नाही. याशिवाय मुदत विम्याचा प्रीमियम इतर कोणत्याही जीवन विम्यापेक्षा कमी असतो.

Best Life Insurance Plans
Car Insurance : गाडीचा Insurance काढताय? या 3 गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर होईल नुकसान

टर्म प्लॅनचे किती प्रकार आहेत

टर्म प्लॅनचे 5 प्रकार आहेत जसे की रेग्युलर प्लॅन, प्रीमियमचा परतावा, स्टॅगर्ड पेआउट, सिंगल प्रीमियम आणि इनक्रिझिंग/डिक्रीझींग करणे. रेग्युलर प्लॅन हे संरक्षणाचे सर्वात बेसिक स्वरुप आहे आणि विमाधारकाच्या मृत्यूवर विमा रक्कम देते.

30 वर्षांच्या व्यक्तीसाठी 40 वर्षांसाठी 1 कोटी रुपयांच्या टर्म प्लॅनसाठी वार्षिक प्रीमियम 11,210 रुपये आहे. प्रीमियमच्या बदल्यात मृत्यू लाभ देखील उपलब्ध आहे.

परंतु जर विमाधारक मुदतपूर्ती कालावधीत टिकला तर, योजना भरलेले प्रीमियम परत करते. यामध्ये, मुदत 10 ते 40 वर्षांपर्यंत असू शकते. 30 वर्षांच्या व्यक्तीसाठी 1 कोटी रुपयांच्या 40 वर्षांच्या टर्म प्लॅनसाठी वार्षिक प्रीमियम 17,969 रुपये आहे.

Best Life Insurance Plans
Insurance policy : तूम्ही Life Insurance अजून काढला नाही? जाणून घ्या का आहे गरज

कोणी खरेदी करावी

स्टेगर्ड पेआउट्समध्ये, नॉमिनीला मृत्यू लाभाचा एक भाग प्राप्त होतो तर उर्वरित रक्कम 10 ते 20 वर्षांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये दिली जाते. सिंगल प्रीमियममध्ये, संपूर्ण प्रीमियम एकाच वेळी भरला जातो. विम्याची रक्कम वाढवत/कमी करून बदलली जाऊ शकते.

यामध्ये, वाढत्या मुदतीच्या योजनेसाठी 30 वर्षांच्या व्यक्तीसाठी 1 कोटी रुपयांचा वार्षिक प्रिमियम 22,801 रुपये आहे. तुम्ही नोकरी करत असाल आणि बाकीचे कुटुंब तुमच्यावर अवलंबून असेल तर तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही हे खरेदी केले पाहिजे.

Best Life Insurance Plans
Types of Life Insurance : जीवन विमाचे प्रकार किती?; तूमच्यासाठी योग्य असलेली पॉलिसी कशी निवडाल

युलिप (युनिट लिंक्ड विमा योजना)

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनमध्ये विमा आणि गुंतवणूक दोन्ही समाविष्ट असतात. या अंतर्गत तुमच्या प्रियजनांना आर्थिक सुरक्षिततेचा लाभ मिळतो. यासोबतच दीर्घकालीन पैसा जमा होण्यासही मदत होते.

Best Life Insurance Plans
Heartbreak Insurance Fund : पठ्ठ्याने लढवली शक्कल! ब्रेकअप झाल्यावर मिळाले तब्बल 25 हजार रूपये

बचत आणि गुंतवणूक योजना

या प्रकारची जीवन विमा योजना विमाधारक आणि त्याच्या कुटुंबाला भविष्यातील खर्चासाठी एकरकमी निधीची हमी देते.

अशा योजना केवळ अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी उत्तम बचत साधनेच देत नाहीत, तर तुमच्या कुटुंबाला विमा संरक्षणाच्या स्वरूपात विशिष्ट रकमेची हमीही देतात. या प्रकारच्या जीवन विमा श्रेणीमध्ये पारंपारिक आणि युनिट-लिंक्ड अशा दोन्ही योजनांचा समावेश होतो.

Best Life Insurance Plans
Crop Insurance : पीकविमा कंपनीच्या कारभाराने शेतकरी हैराण; असून अडचण, नसून खोळंबा!

बाल विमा पॉलिसी

मुलांचा शैक्षणिक खर्च आणि इतर गरजा लक्षात घेऊन या योजना तयार करण्यात आल्या आहेत. बाल विमा पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर एकरकमी रक्कम दिली जाते पण पॉलिसी लॅप्स होत नाही.

भविष्यातील सर्व प्रीमियम्स माफ केले जातात आणि विमा कंपनी पॉलिसीधारकाच्या वतीने गुंतवणूक करणे सुरू ठेवते. मुलाला ठराविक कालावधीसाठी पैसे मिळतात.

Best Life Insurance Plans
Crop Insurance : पाहणी न करता तक्रार निकाली, विमा कंपनीचा प्रताप

सेवानिवृत्ती योजना

या योजनेत जीवन विमा संरक्षण उपलब्ध नाही. ही एक निवृत्ती समाधान योजना आहे. या अंतर्गत तुम्ही तुमच्या धोक्याचे मूल्यांकन करून सेवानिवृत्ती निधी तयार करू शकता.

ठराविक कालावधीनंतर तुम्हाला किंवा तुमच्यानंतरच्या लाभार्थींना पेन्शन म्हणून विशिष्ट रक्कम दिली जाईल. यामधील पेमेंट मासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर असू शकते.

Best Life Insurance Plans
Health Insurance: या सरकारी योजनेत मिळतो 5 लाखांचा मोफत आरोग्य विमा! ऑनलाइन कार्डसाठी असे करा अप्लाय

एंडॉवमेंट विमा योजना

या प्रकारच्या जीवन विमा पॉलिसीमध्ये विमा आणि गुंतवणूक दोन्ही असतात. या पॉलिसीमध्ये विशिष्ट कालावधीसाठी जोखीम कव्हर असते आणि त्या कालावधीच्या शेवटी बोनससह विमा रक्कम पॉलिसीधारकाला परत केली जाते.

पॉलिसीच्या रकमेचे दर्शनी मूल्य पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर किंवा निर्दिष्ट वर्षानंतर एंडोमेंट पॉलिसी अंतर्गत दिले जाते. काही पॉलिसी गंभीर आजाराच्या बाबतीत देखील पैसे देतात.

Best Life Insurance Plans
Health Insurance Plan : कुटुंबासाठी कसा निवडाल बेस्ट इन्शुरन्स प्लान

मनी बॅक विमा योजना

ही पॉलिसी फक्त एक प्रकारची एंडॉवमेंट पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक आणि विमा यांचे मिश्रण आहे. फरक असा आहे की या जीवन विमा पॉलिसीमध्ये बोनससह विम्याची रक्कम पॉलिसीच्या कालावधीतच हप्त्यांमध्ये परत केली जाते.

शेवटचा हप्ता पॉलिसीच्या शेवटी उपलब्ध आहे. पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास संपूर्ण विम्याची रक्कम लाभार्थीला मिळते. पण, या पॉलिसीचा प्रीमियम सर्वाधिक आहे.

Best Life Insurance Plans
Health Insurance : डेंग्यूचा धोका वाढतोय; विमा पॉलिसीचा होईल का फायदा ?

आजीवन जीवन विमा

लाइफलाँग लाइफ इन्शुरन्स म्हणजेच संपूर्ण जीवन विमा योजनेत तुम्हाला आयुष्यभर संरक्षण मिळते. म्हणजेच पॉलिसीला कोणतीही मुदत नाही. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला विमा हक्क मिळतो.

इतर जीवन विमा पॉलिसींची कमाल वयोमर्यादा असते, जी साधारणपणे ६५-७० वर्षे असते. त्यानंतर नॉमिनीचा मृत्यू झाल्यास मृत्यूचा दावा करू शकत नाही. पण लाइफ लाइफ इन्शुरन्स अंतर्गत पॉलिसीधारकाचा वयाच्या ९५ व्या वर्षी मृत्यू झाला असला तरीही नॉमिनी दावा ठोकू शकतो.

या पॉलिसीचा प्रीमियम खूप जास्त आहे. या पॉलिसी अंतर्गत पॉलिसीधारकास विमा रक्कम अंशतः काढण्याचा पर्याय आहे. याशिवाय, तो पॉलिसीवर कर्जाच्या स्वरूपात पैसे देखील घेऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.