HDFC बँकेत लहान मुलांसाठीही आहे स्पेशल सेव्हिंग अकाऊंट!

सुपर किड्स बचत खाते कोण उघडू शकते ?
HDFC Bank Super Kids Savings Account
HDFC Bank Super Kids Savings Accountesakal
Updated on
Summary

सुपर किड्स बचत खाते कोण उघडू शकते ?

HDFC Bank Super Kids Savings Account : खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) तुम्ही तुमच्या मुलांसाठी बचत खाते उघडू शकता. ज्याचे अनेक फायदे आणि सुविधा आहेत. सुपर किड्स बचत खात्याच्या (Super Kids Savings Account) नावाने हे बचत खाते खूप लोकप्रिय आहे. यामध्ये तुम्हाला हेल्थकेयर, शॉपिंग आणि शैक्षणिक लाभ मिळतात.

HDFC Bank Super Kids Savings Account
HDFC Mutual Fund: एचडीएफसी आणतंय 2 नवीन फंड, कमाईची उत्तम संधी!

सुपर किड्स बचत खाते कोण उघडू शकते ?

तुमचे एचडीएफसी बँकेत बचत खाते असल्यास, तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने (18 वर्षांपर्यंत) सुपर किड्स बचत खाते उघडू शकता. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुमचे बँक खाते एचडीएफसी बँकेत नसल्यास, तुम्हाला ते उघडावे लागेल, त्यानंतरच तुम्ही सुपर किड्स बचत खाते उघडू शकता. खात्यातील तिमाही सरासरी बॅलेन्स 1 लाख असावेत किंवा 4 लाखांची एफडी असली पाहिजे.

सुपर किड्स बचत खात्याची वैशिष्ट्ये

बँकेत सुपर किड्स बचत खाते उघडल्यावर, तुम्हाला 5000 किमतीचे ई-गिफ्ट व्हाउचर, 1000 रुपयांचे NetMeds व्हाउचर, 1000 रुपये किमतीचे अपोलो फार्मसी ई-गिफ्ट कार्ड किंवा 999 रुपये किमतीचे MediBuddy मेंबरशिप व्हाउचर मिळेल. याशिवाय, हेमेलिस ई-गिफ्ट कार्ड/ मिंत्रा ई-गिफ्ट कार्ड/ फर्स्टक्राय ई-गिफ्ट कार्ड (Hamelys E-Gift Card/Myntra E-Gift Card/Firstcry E-Gift Card) ज्याची किंमत जवळपास 1000 रुपयांची असेल .

HDFC Bank Super Kids Savings Account
HDFC चा लाइफ रिटायरमेंट प्लॅन! काय आहेत वैशिष्ट्ये?

एचडीएफसी बँक सुपर किड्स सेव्हिंग खात्याचे फायदे

- पालकांचा मृत्यू झाल्यास 5 लाख रुपयांचा इंश्युरंस कव्हर मोफत उपलब्ध आहे.

- तुमच्या परवानगीने मुलाच्या नावाने एटीएम किंवा डेबिट कार्ड जारी केले जाते.

- तुमचे मूल या एटीएम कार्डमधून दररोज जास्तीत जास्त 2500 रुपये काढू शकते आणि व्यापाऱ्यांवर दररोज 10 हजार रुपये खर्च करू शकते.

- एटीएममधून होणारे व्यवहार पूर्णपणे मोफत आहेत. ई-स्टेटमेंट ईमेलवर विनामूल्य उपलब्ध आहे

- सुपर किड्स बचत खातेधारकाला पासबुक मोफत मिळते.

- नेटबँकिंग, फोनबँकिंग आणि मोबाइलबँकिंगसारख्या बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये, मुलाला त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासण्याची, युटिलिटी बिले भरण्याची किंवा एसएमएसद्वारे पुढील चेक पेमेंट करण्याची परवानगी दिली जाते.

HDFC Bank Super Kids Savings Account
HDFC च्या स्टॉकमध्ये 36 टक्के वाढीची शक्यता, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला

किती चार्जेस ?

तुमच्या एचडीएफसी बँक सुपर किड्स सेव्हिंग खात्यात तिमाही सरासरी शिल्लक 1 लाख रुपये नसल्यास, तुम्हाला 299 ते 999 रुपये चार्ज द्यावे लागेल. प्रत्येक आर्थिक वर्षात 25 पानांचे चेकबुक मोफत असते पण त्यानंतर तुम्हाला तेवढ्याच पानांच्या चेकबुकसाठी 100 रुपये द्यावे लागतील. याशिवाय दर महिन्याला पाच फ्री कॅश ट्रांझॅक्शन करता येतील. त्यानंतर, सहाव्या ट्रांझॅक्शनपासून, तुम्हाला प्रत्येक वेळी150 रुपये चार्ज द्यावा लागेल. फोन बँकिंग आणि एटीएम कार्ड विनामूल्य आहे. पिन रिजनरेशनसाठी 50 रुपये द्यावे लागतील. याशिवायही काही चार्जेस आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.