HDFC Bank FD Rates : नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने ग्राहकांसाठी बल्क एफडीवरील व्याजदर 2 कोटी रुपयांवरून 5 कोटी रुपयांपर्यंत सुधारित केले आहेत.
बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन दर 27 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ग्राहक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची एफडी मिळवू शकतात आणि यासाठी त्यांना जास्तीत जास्त 7.15% व्याज मिळते.
नवीन दर काय आहेत :
7 दिवस ते 29 दिवस - 4.50%
30 दिवस ते 45 दिवस - 5.25%
46 दिवस ते 60 दिवस - 5.50%
६१ दिवस ते ८९ दिवस - ५.७५%
90 दिवस ते 6 महिने - 6.10%
6 महिने ते 9 महिने - 6.35%
9 महिने ते 1 वर्ष - 6.50%
1 वर्ष ते 15 महिने - 6.75%
15 महिने ते 2 वर्षे - 7.15%
2 वर्षे ते 10 वर्षे - 7.00%
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर ग्राहकांना 7-29 दिवसांसाठी 3 टक्के, 30-45 दिवसांसाठी 3.50 टक्के, 46 दिवसांच्या एफडीसाठी 4.50 टक्के व्याज मिळत आहे.
सहा महिन्यांच्या एका दिवसापासून ते 9 महिन्यांपर्यंतच्या एफडीवर 5.75 टक्के, 9 महिने एक दिवस ते 1 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6 टक्के आणि 1 वर्ष ते 15 महिन्यांपर्यंतच्या एफडीवर 6.50 टक्के व्याजदर आहे. त्याच वेळी, 15 महिने ते 10 वर्षांच्या FD वर 7 टक्के व्याजदर आहे.
बँक ऑफ बडोदानेही एफडीवरील व्याजदरात केली वाढ :
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. BoB ने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदर 15 ते 65 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.15 ते 0.65% पर्यंत वाढवले आहेत. देशांतर्गत रिटेल मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. नवीन दर 26 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.