क्रेडिट कार्डवरील EMI उपयुक्त आणि सोयीस्कर असू शकते, परंतु त्याचा लाभ घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
क्रेडिट कार्डवरील (Credit Card) EMI उपयुक्त आणि सोयीस्कर असू शकते, परंतु त्याचा लाभ घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमच्याकडे बॅंक (Bank) बॅलन्स नसताना एखादी वस्तू खरेदी करायची असेल तेव्हा EMI उपयोगी ठरते. आपल्या सर्वांच्या स्वप्नातील सुट्टी, ऑनलाइन कोर्स, आयफोन किंवा महागडा फोन, घरासाठी फर्निचर (Home Furniture) अशा अनेक गरजा असतात. कधी पैसा असतो, कधी नसतो; अशा वेळी, क्रेडिट कार्ड अत्यंत फायदेशीर ठरू शकतात, जर ते शहाणपणाने आणि विवेकपूर्णतेने वापरले गेले तर. (Here are the things to keep in mind before converting credit card costs into EMIs)
खरेदीचे ईएमआयमध्ये रूपांतर कधी करायचे?
खरेदी नेहमी आपला खिसा लक्षात घेऊनच करावी. तथापि, अशा अनेक परिस्थिती असतात जेव्हा तुम्हाला खरेदी करावी लागते, अशा परिस्थितीत क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु हे लक्षात ठेवा की, जर तुम्हाला पैसे भरण्यास उशीर झाला तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. याशिवाय व्याजदरही खूप जास्त असणार. बॅंक बॅलन्स नसताना एखादी वस्तू खरेदी करायची असेल तेव्हा EMI उपयोगी ठरते. तुम्ही क्रेडिट कार्डवर जास्त खर्च करत असलात तरी, EMI तुम्हाला जास्त व्याजदरापासून वाचवू शकते.
क्रेडिट कार्डवर EMI निवडताना लक्षात ठेवा या गोष्टी
गरज समजून घ्या : EMI वर घेतलेल्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील की नाही हे लक्षात ठेवा. आवेगाने खरेदीचा निर्णय घेऊ नका.
उत्पन्न लक्षात ठेवा : तुमच्या सध्याच्या पगारातून EMI देखील कापला जाईल याची जाणीव ठेवा, त्यामुळे EMI घेण्यापूर्वी तुम्ही किती EMI भरू शकाल ते पाहा. त्यामुळे तुमच्यावर भार पडणार नाही.
प्रक्रिया शुल्क : EMI योजनांमध्ये प्रक्रिया शुल्क (Processing Fee) आकारले जाते. ईएमआय घेण्यापूर्वी त्याबद्दल पूर्णपणे जाणून घ्या. याशिवाय अनेक बॅंका शून्य व्याजदरावर ईएमआय ऑफर देतात, तुम्ही त्यांचा लाभ घेऊ शकता.
उपलब्ध क्रेडिट : तुम्ही तुमच्या कार्डवर पुरेसे क्रेडिट असल्याची खात्री करणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचा EMI नाकारला जाणार नाही. क्रेडिटची रक्कम तुम्ही ईएमआयमध्ये रूपांतरित करू इच्छित असलेल्या रकमेपेक्षा जास्त किंवा समान असावी.
उशिरा पेमेंट केल्यावर काय होते? : हे नेहमी लक्षात ठेवा की जर तुमचा EMI चुकला तर बॅंक तुमच्याकडून दंड म्हणून शुल्क आकारेल आणि कारवाईही केली जाऊ शकते.
क्रेडिट मर्यादेत तात्पुरती घसरण : EMI योजना सुरू होताच तुमची बॅंक EMI पर्यायाद्वारे तुम्ही केलेल्या खरेदीच्या मूल्याएवढी रक्कम तात्पुरती ब्लॉक करेल. तथापि, तुम्ही तुमचा ईएमआय भरणे सुरू करताच, तुमची बॅंक तुमची क्रेडिट मर्यादा तुमच्या मासिक ईएमआयच्या बरोबरीने पुन्हा वाढवण्यास सुरुवात करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.