एकदा चार्जिंग केल्यानंतर 210 किलोमीटर पळणार स्कूटर; जाणून भन्नाट फिचर्स

hero electricals new variant
hero electricals new variant
Updated on

नवी दिल्ली: हिरो इलेक्ट्रिकने भारतात  Hero Electric Nyx-HX स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर एकदा चार्जिंग केल्यानंतर तब्बल 210 किलोमीटरपर्यंतचे रनिंग करू शकते, असा कंपनीचा दावा आहे. Hero Nyx-HX इलेक्ट्रिक सीरिजच्या स्कूटरची किंमत 64 हजार 640 रुपयांपासून सुरू होते. महिंद्राने स्कूटरचे अनेक व्हेरिएंट लाँच केले असून त्यातील टॉप व्हेरिएंटची किंमत 1 लाख 9 हजार 440 रुपये आहे.

व्यावसायिक वापरासाठी चांगली गाडी-
हिरो इलेक्ट्रिकने व्यावसायिक वापरासाठी इलेक्ट्रिक स्कूटर्सची नवी श्रेणी सुरू केली आहे. त्यामध्ये छोट्या-मोठ्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी या स्कूटरचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच या गाड्यांना इंधनाचा अतिरिक्त खर्चही नसणार आहे. तसेच ही गाडी इकोफ्रेंडलीही असणार आहे. ही हिरो इलेक्ट्रिक स्कूटर 210 किलोमीटरच्या मायलेजसह टॉप व्हेरिएंट आहे. यापुर्वीच्या व्हेरिएंटची क्षमता एकदा चार्जिंग केल्यानंतर ती 72 किलोमीटर धावू शकत होती.  

आवश्यकतेनुसार कस्टमायझेशन शक्य-
हिरो इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या या नव्या मालिकेचा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार कस्टमाइज करू शकता. या सीरिजच्या स्कूटरची रनिंग प्राइज खूपच कमी आहे. तसेच तुम्ही थोडेफार जड सामानही या गाडीवरून सहजपणे वाहून नेऊ शकता. हिरो इलेक्ट्रिक स्कूटरमध्येही स्मार्ट कनेक्टिव्हिटी आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून त्यावर नियंत्रणही ठेवू शकता.

42 kmph टॉप स्पीड-
Hero Nyx-HX इलेक्ट्रिक सीरिजमधील मोटार 0.6 किलोवॉटची आहे. तसेच याचा वेग ताशी 42 किलोमीटर आहे. यामध्ये 1.536 किलोवॉटचा बॅटरी पॅकचा पर्याय आहे. हिरो इलेक्ट्रिकने बिझनेस टू बिझनेस सोल्युशनसाठी नवीन सीरिज स्कूटर लाँच केली असून बाजारातील बजाजसह इतर कंपन्यांच्या व्यावसायिक इलेक्ट्रिक स्कूटर्सला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

(edited by- pramod sarawale)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()