Hindenburg Research : अदानींचे शेअर्स कोसळल्याने हिंडनबर्ग कमवतेय कोट्यवधी; नेमकं हे 'शॉर्ट सेलिंग' असतं काय?

Hindenburg Research makes money as Adani group shares tumble know What is short selling and how is it done
Hindenburg Research makes money as Adani group shares tumble know What is short selling and how is it done
Updated on

What is short selling : हिंडनबर्ग रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यानंतर शॉर्ट-सेलिंग हा मुद्दा देखील सतत पुढे येतो आहे. हिंडनबर्ग ही एक शॉर्ट सेलिंग करणारी कंपनी आहे. ज्यांनी २४ जानेवारी रोजी अदानी समूहाविरोधात एक रिपोर्ट पब्लिश केल आहे. या रिपोर्टमध्ये या कंपनीने अदानी उद्योग समूहावर शेअर्सच्या किमती आणि अकाउंटींगमध्ये फेरफार केल्याचे आरोप लावले आहेत.

हिंडनबर्ग रिपोर्ट पुढे आल्यानंतर अदानींच्या कंपन्याचे शेअर धडाधड कोसळले आहेत. त्यांचे एकूण मुल्य तब्बल ११७ अब्ज डॉलरने कमी झाले आहे.

अदानी हिंडनबर्ग रिसर्च ही फक्त संशोधन करणारी फर्म नाहीये. तर ही एक 'शॉर्ट सेलर' फर्म आहे. ज्यांना अदानी ग्रुपच्या शेअर कोसळण्याचा भरपूर आर्थीक फायदा मिळत आहे. इकडे अदानी उद्योग समूहाचे शेअर कोसळत आहेत आणि दुसरीकडे हिंडनबर्ग पैसे कमवत आहेत. हिंडनबर्गने स्वतःच रिपोर्ट जारी करत त्यांनी अदानी ग्रुपच्या शेअर्सचे शॉर्ट सेलिंग केल्याचे सांगितले आहे.

Hindenburg Research makes money as Adani group shares tumble know What is short selling and how is it done
Turkey Syria Earthquake : भूकंपानंतर तुर्की-सीरियात मृत्यूचे तांडव सुरूच! मृतांचा आकडा 21000 पार

हे शॉर्ट सेलिंग नेमकं असतं काय? (What is short selling?)

शॉर्ट शेलिंग शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची एख पध्दत आहे. यामध्ये गुंतवणूकदार कोणत्याही कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या वाढीवर पैसे लावत नाही तर याउलट कंपनीचे शेअर्सच्या किमती खाली जाण्यावर पैसे लावले जातात.

गुंतवणूकदाराला ज्या कंपनीचे शेअर्स कोसळतील असा विश्वास असतो त्यांचं शॉर्ट सेलिंग केलं जातं. यामध्ये शेअर्स उधार खरेदी करून विकूले जातात आणि काही दिवसांनी जेव्हा शेअर्सची किंमत पडते तेव्हा ते स्वस्तात पुन्हा खरेदी करून परत केले जातात.

शॉर्ट सेलिंगमध्ये गुंतवणूकदार एखाद्या कंपनीचे शेअर्स हमखास पडतील यावर पैसे लावत असतो. यामध्ये खूप मोठी जोखीम असते. कारण किंमत कमी होण्याएवजी वाढली तर खूप मोठं नुकसान होऊ शकते. पारंपारिक पध्दतीमध्ये गुंतवणूकदार शेअर्सच्या किंमती वाढण्यावर पैसे कमवतात. तर शॉर्ट सेलिंगमध्ये मात्र गुंतवणूकदार शेअर्सच्या किंमती पडल्याने फायदा कमवतात.

Hindenburg Research makes money as Adani group shares tumble know What is short selling and how is it done
PM Modi : 'बाअदब, बामुलाहिजा, होशियार! शहंशाह मोदी…'; मोदींच्या मुंबई दौऱ्याआधी झाकल्या झोपड्या

शॉर्ट सेलिंग कसं केलं जातं? (how is short selling done?)

शॉर्ट सेलिंगचे एक उदाहरण सांगायचे झाल्यास, समजा एक कंपनी 'एक्स' जीच्या एका शेअरची किंमत १०० रुपये आहे. गुंतवणूकदारांना वाटतंय की या कंपनीच्या शेअर्सची किंमत काही दिवसांत ५० रुपयांवर येईल.

अशा वेळी गुंतवणूकदारांना या कंपनीचे १० शेअर्स सध्याच्या १०० रुपयाच्या भावाने १००० रुपयांना मिळतील. नंतर काही दिवसांनी जेव्हा शेअर्सचा भाव ५० रुपयांपर्यंत खाली येतो, तेव्हा पुन्हा बाजारातून 'एक्स' कंपनीचे १० शेअर्स विकत घेऊन ते ब्रोकरला परत केले जातात. अशा प्रकारे ५०० रुपयांचा फायदा कमवला जातो.

Hindenburg Research makes money as Adani group shares tumble know What is short selling and how is it done
Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवरील बर्फामागचं रहस्य अखेर उलगडलं! संताप होईल अनावर

हिंडनबर्ग काय करते..

मागील काही दिवसांपासून हिंडनबर्ग अशा प्रकराच काम करत आहे. ही फर्म त्यांच्या खोल रिसर्चच्या जोरावर एखाद्या बड्या कंपनीतील गैरव्यवहार उघड करते. त्यानंतर त्या कंपनीचे शेअर्स कोसळतात. त्यानंतर हिंडनबर्ग मोठा धोका पत्करून स्वच्या रिसर्चच्या आधारावर शॉर्ट सेलिंग करते. अशा बड्या कंपनीच्या शेअर्सचे शॉर्ट सेलिंग करून हिंडनबर्ग पैसे कमवते, अदानी समूहाच्या आधी देखील त्यांनी काही कंपन्यांबाबद हे केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()