हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या (Hindustan Aeronautics) शेअर्सने बुधवारी बीएसईच्या इंट्राडेवर 7 टक्क्यांहून अधिक वाढीसह 2,709 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. कंपनीला इंडियन कोस्ट गॉर्डकडून नऊ एडवांस्ड लाइट हेलिकॉप्टर्स (एएलएच) एमके-3 साठी लेटर ऑफ इंटेंट (LoI) मिळाले आहेत.
या बातमीनंतर शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली. या स्टॉकने 12 सप्टेंबर 2022 रोजी 2,639 रुपयांच्या मागील उच्चांकाला स्पर्श केला होता. त्यादिवशी शेवटी हा शेअर 5.87 टक्क्यांनी वाढून 2,682.15 रुपयांवर बंद झाला. (Hindustan Aeronautics share price)
बीएसईआणि एनएसई दोन्हीवर हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या शेअर्सचे एकूण ट्रेडिंग व्हॉल्यूम 6 पटीने वाढले आणि 52 लाखाच्या शेअर्सचे व्यवहार झाले. या वर्षी एचएएलचा शेअर 123 टक्क्यांनी मजबूत झाला आहे, विशेष म्हणजे या दरम्यान एस अँड पी बीएसई सेन्सेक्स केवळ 4.8 टक्क्यांनी मजबूत झाला होता.
कंपनीने 16 ALH Mk-III हेलिकॉप्टर भारतीय तटरक्षक दलाला (ICG) सुपूर्द केल्याचे एचएएलने मंगळवारी सांगितले. मार्च 2017 मध्ये, एचएएलने अंदाजे 5,126 कोटी रुपयांच्या 16 हेलिकॉप्टरच्या पुरवठ्यासाठी करार मिळवला होता. ALH Mk III स्वदेशी डिझाइन, विकसित आणि उत्पादित आहे. कंपनीने आतापर्यंत 330 पेक्षा जास्त ALH बांधले आहेत.
मजबूत ऑर्डर बूक
पुढील सहा महिन्यांत आणखी नऊ हेलिकॉप्टरचे काँन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आयसीआयसीआय सिक्युरिटीजला वाटत आहे. एचएएलची तुमकूर (कर्नाटक) फॅसिलिटी आर्थिक वर्ष 2023 च्या तिमाहीत सुरू होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर एचएएलची वार्षिक क्षमता 60 हेलिकॉप्टर असेल, जी ALH, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) किंवा लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) असू शकते. एचएएलचकडे सप्टेंबर 2022 पर्यंत 83,858 कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.