हिंदुस्थान युनिलिव्हरचा व्यवसाय शहरी भागात सुधारण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे ब्रोकरेज हाऊसला हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी दिसेल असा विश्वास आहे.
येणाऱ्या वर्षात हिंदुस्थान युनिलिव्हरचा (HINDUSTAN UNILEVER) त्याच्या गुंतवणुकदारांना भरभक्कम परतावा देईल असा विश्वास ब्रोकरेज हाऊसना वाटत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरचा (HINDUSTAN UNILEVER) व्यवसाय शहरी भागात सुधारण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे ब्रोकरेज हाऊसला हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी दिसेल असा विश्वास आहे. दिग्गज ब्रोकरेज मॅक्वेरीने (Macquarie), या स्टॉकवर सर्वाधिक 3300 च्या टार्गेटसह आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे आणि CITI आणि NOMURA ने देखील खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजचे मत काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
CITI चे मत
CITI ने हिंदुस्थान युनिलिव्हरवर (HINDUSTAN UNILEVER)बाय रेटिंग (Buy Rating) दिले आहे आणि स्टॉकसाठी Rs 3,065 चे टारगेट निश्चित केले आहे. कंपनी बाजारातील आव्हानांना योग्य पद्धतीने तोंड देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कंपनीचा मार्केट शेअर आणि व्हॉल्यूम सतत वाढत आहे. वार्षिक आधारावर तिसर्या तिमाहीसाठी 11 टक्के महसूल वाढीचा अंदाज कायम आहे.
NOMURA चे मत
NOMURA नेही हिंदुस्थान युनिलिव्हरवर (HINDUSTAN UNILEVER) वर बाय रेटिंग (Buy Rating) आहे आणि स्टॉकसाठी 2,950 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. तिसर्या तिमाहीत व्यापारात सुधारणा दिसली आहे. दुसऱ्या तिमाहिच्या तुलनेत जास्त दरवाढ शक्य आहे. तिसर्या तिमाहीत 11टक्के महसूल वाढ शक्य आहे आणि तिसर्या तिमाहीत 2 टक्के वाढ शक्य आहे.
MACQUARIE चे मत
MACQUARIE ने हिंदुस्थान युनिलिव्हरवर (HINDUSTAN UNILEVER) आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे. या स्टॉकसाठी त्यांनी 3300 रुपयांचे टारगेट दिले आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये व्हॉल्यूम वाढीत सुधारणा शक्य आहे. दुसरीकडे, किमती वाढल्याने तिसऱ्या तिमाहिच्या व्हॉल्युमवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.