MSEB Employee Strike: ज्या कंपनीमुळे वीज कर्मचारी संपावर गेलेत त्या अदानी पॉवरचा असा आहे इतिहास

अदानी पॉवर कंपनीला वीजवितरणाची परवानगी देण्याच्या विरोधात महावितरणमधील अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला आहे.
Adani Power Company History
Adani Power Company HistorySakal
Updated on

महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. अदानी पॉवर कंपनीला वीजवितरणाची परवानगी देण्याच्या विरोधात महावितरणमधील अभियंते तसेच कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला आहे.

अदानी कंपनीने समान वीज वितरणासाठी परवानगी मागितली आहे. तसेच यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकार अदानी समूहाला वीजवितरणाचा परवाना देण्याची शक्यता आहे. (MSEB Employee Strike)

अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये, ही या संपकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. 

सध्या अदानी वीज क्षेत्रातील त्यांचा हिस्सा वाढवण्याच्या प्रयत्न करत आहेत. या अदानी पॉवर कंपनीचा इतिहास काय आहे ते जाणून घेऊयात.

अदानी पॉवर 1996 मध्ये पॉवर ट्रेडिंग कंपनी म्हणून सुरू करण्यात आली. जुलै 2009 मध्ये मुंद्रा येथे 4,620 मेगावॅटच्या पहिल्या 330 मेगावॅटच्या RAM अंमलबजावणीद्वारे उत्पादनास सुरुवात झाली. हा भारतातील सर्वात मोठा सिंगल लोकेशन कोळसा-आधारित ऊर्जा प्रकल्प आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

अदानी गोड्डा पॉवर झारखंड येथे 1,600 मेगावॅटचा प्रकल्प राबवत आहे. कंपनीने गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, आणि पंजाब सरकारसोबत सुमारे 9,153 मेगावॅटचे दीर्घकालीन वीज खरेदी करार केले आहेत.

कंपनीने नोव्हेंबर 2010 पर्यंत आणखी तीन 330 मेगावॅट आणि 22 डिसेंबर 2010 रोजी देशातील पहिले सुपरक्रिटिकल युनिट 660 मेगावॅट सुरू केले. ज्यामुळे त्याची क्षमता 1,980 मेगावॅट झाली.

3 एप्रिल 2014 रोजी, कंपनीने महाराष्ट्रातील तिरोडा येथील पॉवर प्लांटमध्ये 660 मेगावॅटचे चौथे युनिट सुरू केल्याची घोषणा केली, अशा प्रकारे 9,280 मेगावॅट क्षमतेसह भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज उत्पादक म्हणून उदयास आली.

Adani Power Company History
Electricity workers strike : महावितरण कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी काय?

 2015मध्ये, त्यांच्या अदानी पॉवर कंपनीने उडुपी औष्णिक उर्जा प्रकल्प 6,300 कोटी रुपयांना विकत घेतला त्या वाटाघाटी फक्त 100 तासांत संपवण्याचा रेकॉर्ड अदानींनी केला.

31 मार्च 2019 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत, अदानी पॉवरने 634.64 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. 2018 या आर्थिक वर्षात कंपनीने 653.25 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला होता.

अदानी पॉवर कंपनीला गेल्या काही वर्षात तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी अदानी महाराष्ट्रात वीज परवाना मागत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.