घर खरेदी करताना येणार नाही अडचण; Home Loan घेताना करा हे काम

स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं.
 home loan
home loanesakal
Updated on
Summary

स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं.

स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर बांधण्यासाठी सामान्य माणूस आपली संपूर्ण आयुष्याची कमाई घरासाठी वापरतो. अनेकजण घर बांधण्यासाठी कर्ज घेतात, मग कुठे जाऊन घराचे स्वप्न पूर्ण होते. मात्र, आता तुम्हाला गृहकर्ज (Home Loan) सहज मिळू शकतं. सोपी प्रक्रिया आणि कमी व्याजदरात गृहकर्ज मिळवा.

 home loan
तुमच्या घराच्या स्वप्नांसाठी या बँका देतात कमी व्याजदराने Home Loan

गृहकर्जासाठी (Home Loan) वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे नियम आणि व्याजदर असतात. जोडीदार किंवा कुटुंबातील जवळच्या नातेवाईकासोबत गृहकर्ज घेणं सोपं जातं. यामध्ये अधिक करबचतीसह अनेक फायदे आहेत, मात्र हप्ते भरण्यात कोणतीही चूक झाल्यास तीही त्या दोघांसाठी अडचणीची ठरू शकते. पती-पत्नी एकत्र गृहकर्ज घेत असतील तर काही गोष्टींची काळजी घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं.

घरासाठी कर्ज घेताना काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या बँकेकडून कर्ज घेत आहात, व्याजदर किती आहे, ईएमआयची स्थिती काय आहे आणि किती वेळात कर्ज फेडायचे आहे? या सर्व गोष्टींचा अभ्यास करून कर्ज घ्यावे. जर तुम्ही संयुक्तरित्या कर्ज घेत असाल तर त्याचेही अनेक फायदे आहेत.

 home loan
घर घ्यायचंय? पगार 25000, जाणून घ्या किती मिळेल Home Loan

कर्जाचा कालावधी-

गृहकर्जासाठी अर्ज करताना मुदतीचा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावा. कारण मुदतीच्या आधारावर ईएमआय निश्चित केला जातो. बँका साधारणतः ५ ते ३० वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज देतात. आपल्या क्षमतेनुसार योग्य टेनर निवडावा. कमी वेळ निवडल्यास कर्जाचा हप्ता लवकर पूर्ण होईल, पण बराच वेळ निवडून आर्थिक ताण कमी होईल.

ईएमआयचे ओझे-

पती-पत्नी मिळून घरासाठी कर्ज घेत असतील तर याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकावर कर्ज फेडण्याचा बोजा कमी होतो. तुम्ही एकत्र मिळून मोठं घर खरेदी करू शकता. सरकार महिलांना नोंदणी शुल्कात सवलत देते ज्याचा फायदा होऊ शकतो. जर तुम्ही दोघेही करदाते असाल, तर तुम्ही दोघेही वेगवेगळ्या कर सवलतींचा दावा करू शकता, ज्यामुळे तुम्हाला अधिक सूट मिळू शकेल. संयुक्त गृहकर्ज घेतलं की पती-पत्नी या दोघांचीही क्रेडिट लिमिट संपलेली असते. असे झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत किंवा तुमच्या मुलासाठी शैक्षणिक कर्जासाठी (Education Loan) बँक कर्ज देण्यास नकार देऊ शकते.

होम लोन इन्शुरन्स-

पती-पत्नी दोघांनी घरासाठी कर्ज घेतले आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर संपूर्ण कर्ज फेडण्याची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर येते. अशी घटना टाळण्यासाठी गृहकर्जाचा विमा उतरवणं आवश्यक आहे. विमा झाल्यास कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी विमा कंपनीची असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()