इक्विटीची दिशा ठरवणारे सेन्सेक्स आणि निफ्टी 16 मार्च 2020 रोजी 8% पर्यंत खाली आले. बीएसई सेन्सेक्स 2713 अंकांनी घसरून 31,390 वर स्थिरावला तर एनएसई निफ्टी 757.80 पॉइंटनी गडगडत 9197.40 पॉइंटवर आला. बाजारातील घसरण पाहून गुंतवणूकदार हवालदिल झाले, परदेशी गुंतवणूकदार किंवा एफपीआयनी यापूर्वीच रु. 37,976 कोटी इतकी भलीमोठी रक्कम भारतीय बाजारांतून वळती करून घेतली. सर्वच सेक्टर लाल रंगात व्यापार करताना दिसतात. खासगी बँका, वित्त, रियल्टी आणि धातू उद्योगांची 8-9% पर्यंत घसरगुंडी झाली.
जगभरात कच्च्या तेलावरून युद्धसदृश परिस्थितीचे संकेत असताना भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशाकरिता स्थिती चांगली ठरणार आहे. तर मग इक्विटी मार्केट मंदीने बेजार असताना, कमोडीटी आणि करन्सी बाजाराचा अनुभव पाहता तुम्ही तुमच्या पोर्टफोलियोचे निरीक्षण करायची इच्छा होईल. या एकंदर घसरणीचा तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल ते लक्षात घ्या. अशा स्थितीत निश्चित उत्पन्न देणाऱ्या सरकारी बचत योजना आणि Fixed Deposit (मुदत ठेवी) यांना पसंती असते, जेणेकरून तुम्ही पोर्टफोलियो स्थिर ठेवून खात्रीशीर परतावा मिळवू शकता.
बाजाराची पडझड झाली असताना तुमच्या गुंतवणुकीवर कशाप्रकारे प्रभाव पडेल याविषयीचा हा उहापोह.
बाजार आणि तुमच्या गुंतवणुकांची पडझड
बाजाराची दिशा ठरवणाऱ्या घटकांची 20% हून अधिक घसरण झाल्याने भारतीय बाजार अस्थिर बनले आहेत. जेव्हा बाजारात घसरणीची स्थिती होते, तेव्हा भाव गडगडत असताना तुमच्या वैयक्तिक वित्ताचा प्रश्न उभा थकतो. तुमचा पोर्टफोलियो कमालीचा आक्रसलेला असतो. ज्यांना तातडीच्या रोख तरलतेची आवश्यकता भासते, त्यांच्याकरिता अस्थिर बाजार वाईट ठरतो. तर दीर्घकालीन उद्दिष्ट राखणाऱ्यांकरिता चांगला असतो.
तज्ज्ञ वेगळा सल्ला देऊ शकतात: काही तुम्हाला इक्विटी अलॉकेशनचा सल्ला देतील, तर काही तातडीच्या गरजेसाठी पैसे काढून घेण्यास सांगतील. शेवटी, आपल्या हातात किती रोकड असणे आवश्यक आहे आणि तुमची वित्तीय उद्दिष्ट काय आहेत हे महत्त्वाचे ठरते. काही कठोर निर्णयांकरिता जर ही वेळ सर्वोत्तम नाही, तर तुमच्या जोखीम प्रोफाईलचे निरीक्षण करण्यासाठी चांगली वेळ म्हणावी लागेल.
बाजार घसरलेला असताना तुमची जोखीम प्रोफाईल जाणून घ्या
बाजाराची पकड अस्थिरतेने घेतली असताना, गुंतवणुकदारांचा तोटा होत असताना ही वेळ प्रामाणिक स्व-मुल्यांकनाकरिता चांगली ठरते. याचा अर्थ तुमची सध्याची गुंतवणूक तुम्हाला कितपत लांब घेऊन जाईल याचे मूल्यांकन करावे. जर बाजाराशी जोडलेल्या साधनांना असलेले एक्सपोजर अधिक प्रमाणात असल्यास तुम्ही संपत्ती सुरक्षित पर्यायांसाठी गोळा करावी. उदाहरणार्थ, मुदत ठेवी तुम्हाला स्थिर परतावा देऊ करतात. जरी सध्या मुदत ठेवींवरील दरात कपात झाली असली, तरी कंपनीच्या मुदत ठेवींत तुम्हाला स्पर्धात्मक दरांत Fixed Interest Rates मिळू शकतील.
बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटचा पर्याय लक्षात घेतला पाहिजे: या पर्यायातून 8.05% पर्यंतचा व्याज दर देऊ करण्यात येतो आणि आयसीआरए तसेच क्रिसीलने हा पर्याय स्थिर असल्यावर शिक्कामोर्तब केला आहे. या कंपनीच्या एफडीला क्रिसीलचे एफएएए रेटींग आणि आयसीआरएचे एमएएए रेटींग मिळाले आहे. जे त्यांच्या संबंधित वर्गवारीत सर्वोच्च मानले जाते.
विविध गुंतवणूकदारांकरिता 5 वर्षांच्या कालावधीत रु. 25 लाखांची गुंतवणूक कशाप्रकारे वाढते याकरिता खालील तक्ता लक्षात घ्या
ग्राहक प्रकार | व्याज दर | परिपक्वता मूल्य | बचतीची वृद्धी (%) |
नवीन | 7.80% | 36,39,434 | 45.57% |
सध्या अस्तित्वात असलेले | 7.90% | 36,56,346 | 46.25% |
वरिष्ठ नागरिक | 8.05% | 36,81,831 | 47.27% |
हे आकडे FD calculator च्या साह्याने मोजण्यात आले आहेत.
5 वर्षांच्या कालावधीत 45% हून अधिक वृद्धीने नियमित ग्राहकासाठी रु. 25 लाख वाढून रु. 36.39 लाखांवर पोहोचेल, तर सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राहकांसाठी रु. 36.56 लाख आणि वरिष्ठ नागरिकांकरिता रु. 36.81 लाख मिळू शकतील.
अशांततेच्या कालावधीत रोखप्रवाह गाठणे
एफडी हा एक चांगला पर्याय ठरतो कारण तो तुमच्या उद्दिष्टांना पुरेसा रोख तरलता उपलब्ध करून खात्रीशीर परतावा देतो. वास्तविक तज्ज्ञ सल्ला देतात की, जर तुम्हाला पुढील पाच वर्षांत लागेल इतका पैसा गुंतवायचा असल्यास स्टॉक मार्केटविषयी स्पष्ट रहा. तरुण गुंतवणूकदार एसआयपीची सुलभता अनुभवू शकतात, त्यांना बजाज फायनान्सच्या Systematic Deposit Plan सोबत खात्रीशीर परताव्याची हमी राहते.
इथे, तुम्ही दर महिन्याला रु. 5,000 किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम गुंतवू शकता. तुमच्या प्रत्येक योगदानासोबत एक नवीन एफडी तयार होते. ज्या दिवशी तुम्ही गुंतवणूक करता, त्यादिवशीचा व्याज दर तुमच्या गुंतवणुकीवर लागू होतो. तुम्ही सिस्टीमॅटीक डिपॉझीट प्लान सुरू केल्यानंतर जो परिपक्व कालावधी निवडलेला असेल, त्या दरम्यान गुंतवणूक परिपक्व होते. तुम्ही 6 ते 48 वेळा रक्कम जमा करू शकता आणि पहिली जमा रक्कम परिपक्व झाल्यावर दर महिन्याला रोख तरलतेचा अनुभव घेता येतो.
त्यामुळे जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये अस्थिरतेचा अनुभव होतो, तेव्हा तुम्ही स्वत:च्या पैशाचे मोल लक्षात घेऊन विवेकी गुंतवणुकीला मान देणे रास्त ठरते. जेणेकरून तुमच्या गंगाजळीत भर पडेल. एफडी सुरू करण्यासाठी आजच घरी आरामात बसून Bajaj Finance online FD बुक करा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.