पैसा कमवायचा आहे? तुम्हीही वापरा हा फंडा अन् मिळवा मोठा नफा

जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात कराल, तितका जास्त नफा तुम्हाला मिळेल.
Money
Moneyesakal
Updated on
Summary

जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात कराल, तुम्हाला तितका जास्त नफा मिळेल.

पैसा कोणाला नकोसा असतो? पण, करोडपती होणं ही काय सोपी गोष्ट नाहीयेय. यासाठी किती सारं नियोजन करणे गरजेचे असते. तिथेच पैसे कमविण्याचे सूत्र हाती येते. तुम्ही चक्रवाढ व्याजाची (Compound Interest) ताकद समजून घेतली तर तुम्ही करोडपती बनू शकाल. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक (Investment) करायला सुरुवात कराल, तितका जास्त नफा तुम्हाला मिळेल. गुंतवणुकीचे उद्दिष्ट दीर्घकालीन असायला हवे. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हेच स्पष्ट करते.

Money
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

काय आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग?

- मूळ गुंतवणुकीवर व्याज

- दोन्ही फंडांना पुन्हा गुंतवणूक करता येणार

- मुद्दल रक्कम आणि व्याजावर पुन्हा मिळणार व्याज

- गुंतवणूक + व्याज + व्याज + व्याज = चक्रवाढ (कंपाऊंडिंग)

पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचे नियम

- कमी वयातच गुंतवणूक सुरू करा

- दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा

- 5 किंवा 10 वर्षांऐवजी 20 किंवा 25 वर्षांचे लक्ष्य ठेवा

Money
SBI MF कडून मल्टी-कॅप योजना लाँच... गुंतवणूक करावी का ?

15X15X15 पासून पैसे कमवण्याचा फॉर्म्युला

गुंतवणूक - 15 हजार रुपये

कालावधी - 15 महिन्यांसाठी

व्याज - 15 टक्के

कॉर्पस - 15 वर्षानंतर 1 कोटी रुपये

एकूण गुंतवणूक - 27 लाख रुपये

चक्रवाढ - 73 लाख व्याजातून कमाई

कंपाऊंडिंग म्हणजे काय?

गुंतवणूक करताना तुम्ही जे कमावता ते पुन्हा गुंतवणं हे कंपाऊंडिंग आहे. त्यात मुद्दल तसेच त्याच्या व्याजावर व्याजही मिळते. आपली गुंतवणूक दुप्पट, तिप्पट करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कम्पाउंडिंग.

10 वर्षांची गुंतवणूक

- मंथली SIP : 10,000 रुपये

- अनुमानित रिटर्न : 12 टक्के (वार्षिक)

- गुंतवणुकीचा कालावधी : 10 वर्षे

- तुमची एकूण गुंतवणूक : 12 लाख रुपये.

- एसआयपीचे एकूण मूल्य : 23 लाख रुपये

- फायदा : 11 लाख रुपये

Money
‘द पर्चेस हाऊस’मध्ये ‘बीएफडब्ल्यू’ची गुंतवणूक ; स्‍टार्टअपला बळकटी

15 वर्षांची गुंतवणूक

- मंथली एसआईपी: 10,000 रुपये

- अंदाजित परतावा : वार्षिक 12 टक्के

- गुंतवणुकीचा कालावधी : 15 वर्षे

- तुमची एकूण गुंतवणूक : 18 लाख रु.

- एसआयपीचे एकूण मूल्य : 49.96 लाख रुपये

- फायदा : 31.96 लाख रुपये

20 वर्षांची गुंतवणूक

- मंथली एसआईपी: 10,000 रुपये

- अंदाजित परतावा : वार्षिक 12 टक्के

- गुंतवणुकीचा कालावधी : 20 वर्षे

- तुमची एकूण गुंतवणूक : 24 लाख रुपये

- एसआयपीचे एकूण मूल्य : 98.93 लाख रुपये

- बेनिफिट : 74.93 लाख रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.