SBI अन् PNB मध्ये बँक खातं आहे, मिस्ड कॉल द्या जाणून घ्या बॅलन्स

तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पीएनबीमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी
mobile
mobile esakal
Updated on
Summary

तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पीएनबीमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी

तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि पीएनबीमध्ये (PNB) खातं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अकाउंट बॅलन्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाहीयेय. तुम्ही घरी बसून आणि इंटरनेटशिवायही तुमचा बॅलन्स तपासू शकता.

mobile
SBI ग्राहकांसाठी महत्त्वाचे; ATMमधून पैसे काढण्यासाठी 'हा' नंबर महत्त्वाचा

पीएनबीचे (PNB)ग्राहक या नंबरवर मिस्ड कॉल देऊ शकता

आता तुम्ही केवळ एका मिस कॉलसह तुमचे पीएनबी खाते शिल्लक (PNB Account Balance)जाणून घेऊ शकता. यासाठी तुमच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात रजिस्टर्ड केलेल्या मोबाइल क्रमांकावरून तुम्हाला 1800 180 2223 आणि 0120-2303090 यापैकी कोणत्याही क्रमांकावर मिस्ड कॉल करावा लागेल. मिस्ड कॉलच्या थोड्या वेळानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्सची माहिती मिळेल.

mobile
सावधान! SBI चा ग्राहकांना इशारा; चुकूनही या लिंकवर करु नका क्लिक

एसबीआय ग्राहकांना एसबीआय क्विक- मिस्ड कॉल बँकिंग सेवेसाठी नोंदणी करावी लागेल

एसबीआय क्विक - मिस्ड कॉल बँकिंग (SBI Quick – MISSED CALL BANKING) सेवेद्वारे तुम्ही मिस्ड कॉल किंवा एसएमएस पाठवून अनेक माहिती मिळवू शकता. 'एसबीआय क्विक- मिस्ड कॉल बँकिंग सर्व्हिस' अंतर्गत कोणतीही सेवा मिळवण्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल.यासाठी REG टाइप करून मग स्पेस देऊन आपला अकाउंट नंबर लिहून 09223488888 एसएमएस पाठवायचा आहे. उदा.REG <space>, खाते क्रमांक आणि 09223488888 पाठवा. एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्या खात्यात नोंदणीकृत असलेल्या नंबरवरून हा मेसेज पाठवावा.

SBIचे ग्राहक या नंबरवर देतात मिस्ड कॉल

एसबीआय क्विक- मिस्ड कॉल बँकिंगमध्ये नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 09223766666 टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करावा लागेल. काही सेकंदानंतर, संपूर्ण माहिती एसएमएसद्वारे आपल्याला पाठविली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.