अख्खं जग प्लॅस्टिकच्या वाढत्या कचऱ्यामुळे चिंतेत आहे. प्लॅस्टिकचा बराचसा भाग Recycle होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन हैदराबादमधील एका स्टार्ट-अप 'Caro Water' ने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी पाणी पाण्यासाठी प्लास्टिकऐवजी Eco-friendly बॉटल्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आज Plastic bag free day आहे, त्यादृष्टीनेही हा स्टार्ट अप महत्त्वाचा मानला जातो आहे. (Hyderabad techies establishes eco-friendly water boxes start up ‘Caro Water’)
हैदराबादमधील 2 तंत्रज्ञ (Techies) सुनीथ तातिनेनी (Suneeth Tatineni) आणि चैतन्य अयिनपुडी (Chaitanya Ayinapudi) यांनी प्लास्टिक कचरा कमी करण्याच्या उद्देशाने स्टार्ट-अप ‘कॅरो वाटर’ लॉन्च केले आहे. याचा अर्थ ‘प्रिय पाणी’ असा आहे. ‘कॅरो वाटर’ची स्थापना करण्यासाठी या दोघांनी आपली कॉर्पोरेट नोकरी सोडली.
हैदराबादमधील 'कॅरो वॉटर' उपक्रम
एखादी व्यक्ती लांबच्या प्रवासाला जात असेल तर 1 लिटरच्या किमान 5 बॉटल्स तरी नक्की खरेदी करतो. या प्लॅस्टिकच्या बॉटल्सचा 10 टक्के भागही रिसायकल होत नसल्याचे 'कॅरो वॉटर'चे सह-संस्थापक सुनीत तातिनेनी (Suneeth Tatineni) यांनी म्हटले. हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे, आणि याच्यासाठीच आम्ही कार्डबोर्ड बॉक्सचा वापर करून पाणी पॅक करायला सुरू केले.
इको फ्रेंडली बॉक्स आणि बॅग
बॉक्स आणि बॅग इको फ्रेंडली असून नंतर रिसायकल केले जाईल असे त्यांनी सांगितले. यातील कोणतीही बॉटल जमिनीवर किंवा रस्त्यावर टाकू नये याबाबत हैदराबादमधील काही रिसायकलिंग यूनिटसोबत तोडगाही काढला आहे. रिसायकल कार्डबोर्ड आणि आतील वॉटर बॅगचा इतर गोष्टींसाठी ही वापर करता येईल असेही त्यांनी सांगितले. ही बॉटल 5 आणि 20 लीटर अशा 2 व्हेरीयंट्स मध्ये उपलब्ध आहे. 5 लीटरची बॉटल 75 रुपये तर 20 लीटर बॉटलची किंमत 120 रुपये आहे.
लोकांचा चांगला प्रतिसाद
ईको-फ्रेंडली बॉटलमध्ये पाणी सप्लाय करण्याचा संपूर्ण देशातला हा पहिलाच नावीन्यपूर्ण प्रयत्न असल्याचे कंपनीचे संस्थापक चैतन्य यांनी म्हटले. मागच्या केवळ 6 महिन्यात या स्टार्ट-अप अंतर्गत 8,000 हजार पाणी बॉटल्स विकल्या आहेत. हा बदल खोलपर्यंत रुजावा यासाठी छोट्या स्तरावर जसे की हॉस्पिटल्स, हॉटेलसारख्या ठिकाणी जास्त भर द्यावा लागणार आहे. संपूर्ण देशात या इको फ्रेंडली वॉटर बॉटल्सचा वापर सुरू झाल्यास नक्की बदल घडेल असा विश्वास 'कॅरो वॉटर'चे संस्थापक चेतन यांना आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.