मिडकॅप सेगमेंटचे स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहेत का?

देशांतर्गत मॅक्रो परिस्थिती सुधारल्यामुळे मिडकॅप कंपन्या चांगली कामगिरी करतील असा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञांना वाटत आहे.
shares
sharesesakal
Updated on
Summary

देशांतर्गत मॅक्रो परिस्थिती सुधारल्यामुळे मिडकॅप कंपन्या चांगली कामगिरी करतील असा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञांना वाटत आहे.

मिडकॅप सेगमेंटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास आम्ही 6 दमदार शेअर्सची लिस्ट घेऊन आलो आहोत, ते ही शेअर बाजार तज्ज्ञांच्या मदतीने. यात भारत डायनॅमिक्स (Bharat Dynamics), वेलस्पन कॉर्प (Welspun Corp), सोलारा अॅक्टिव्ह (Solara Active), आयबी रिअल इस्टेट (IB Real Estate), जेके लक्ष्मी सिमेंट (JK Laksmi Cement ) आणि वेसुवियस इंड. (Vesuvius Ind ) यांचा समावेश आहे. या 6 शेअर्सबाबत शेअर बाजार तज्ज्ञ काय सांगत आहेत पाहुयात...

शेअर बाजार तज्ज्ञ राजेश पालविया...

- लॉन्ग टर्म: भारत डायनॅमिक्स (Bharat Dynamics)

राजेश पालविया यांनी भारत डायनॅमिक्समध्ये लाँग टर्ममध्ये गुंतवणूक करण्याचे सुचवले आहे. यासाठी 470 ते 480 रुपयांचे टारगेट ठेवण्यात आले आहे. तर 375 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. जेव्हाही हे शेअर्स खाली येतील तेव्हा खरेदी करा असेही ते म्हणाले.

shares
Stocks | 'हे' 4 स्टॉक्स एका महिन्यात देतील चांगली कमाई!

- पोझिशनल: वेलस्पन कॉर्प (Welspun Corp)

राजेश पालविया यांनी वेलस्पन कॉर्पेचे शेअर्स खरेदी करायचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 210 ते 220 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. तर 155 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मागच्या काळात या स्टॉकने चांगली कामगिरी केली आहे आणि पुढेही चांगली कामगिरी राहिल असा त्यांना विश्वास आहे.

- शॉर्ट टर्म: सोलारा अॅक्टिव्ह (Solara Active)

शॉर्ट टर्मसाठी राजेश पालविया यांचा भरवसा सोलारा अॅक्टिव्हवर आहे. या शेअरसाठी 1350 रुपयांचे टारगेट देत 1180 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरमध्ये काही महिन्यांच्या सुधारणेनंतर गेल्या आठवड्यात पुन्हा रिकव्हरी झाली आहे. इथून पुढे आणखी तेजी येण्याची आशा आहे.

shares
मालामाल करतील हे स्टॉक्स; शॉर्ट टर्म शेअर्सचा लॉन्ग टर्म इन्कम

शेअर बाजार तज्ज्ञ विकास सेठी...

- लॉन्ग टर्म: आयबी रिअल इस्टेट (IB Real Estate)

विकास सेठी यांनी लॉन्ग टर्मसाठी आयबी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 250 रुपये टारगेट देण्यात आले आहे. बाजारातील नुकत्याच झालेल्या घसरणीत हा शेअर चांगल्या व्हॅल्युएशनवर आला आहे. रिअल इस्टेट क्षेत्राचा आऊटलूक चांगला आहे. कंपनीची री-रेटिंग अपेक्षित आहे.

पोझिशनल: जेके लक्ष्मी सिमेंट (JK Laksmi Cement)

विकास सेठी यांनी जेके लक्ष्मी सिमेंटची पोझिशनलसाठी निवड केली आहे. त्यांनी या शेअरसाठी 675 रुपयांचे टारगेट दिले आहे. तर 630 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ही एक मजबूत सिमेंट कंपनी आहे, तिला बांधकाम कार्यात तेजीचा फायदा मिळेल. पायाभूत आणि गृहनिर्माण या दोन्ही क्षेत्रांतून प्रचंड मागणी असल्याने हे शेअर्स चांगली कमाई करुन देतील असा सेठींना विश्वास आहे.

shares
हमखास करायचीय कमाई ? किमान 40 टक्के नफा देणारे 'हे' स्टॉक्स...

शॉर्ट टर्म: वेसुवियस इंड (Vesuvius Ind)

विकास सेठी यांनी Vesuvius Ind मध्ये शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला आहे. या शेअरसाठी 1265 रुपये उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर 1210 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिलाय. ही UK स्थित MNC कंपनी आहे, त्यांचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल उत्कृष्ट आले आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.