IT Return: सरकारने कर भरण्याची तारीख वाढवली; या दिवसापर्यंत मिळणार मुदतवाढ

ज्या कंपन्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी ITR भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर होती.
Income Tax Return
Income Tax Returnsakal
Updated on

करदात्यांना आयकर विवरणपत्र भरणे बंधनकारक असते. ते भरण्यासाठी सरकारकडून मुदत दिली जाते, ज्यामध्ये करदात्यांना कोणत्याही परिस्थितीत कर भरावा लागतो. अर्थ मंत्रालयाने बुधवारी वर्ष 2022-23 साठी कंपन्यांकडून आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 7 नोव्हेंबरपर्यंत वाढवली. ज्या कंपन्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी ITR भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर होती.

Income Tax Return
HDFC बँकेने एका महिन्यात दुसऱ्यांदा वाढवले FD चे दर; मिळणार एवढे टक्के रिटर्न

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्याची अंतिम मुदत गेल्या महिन्यात वाढवण्यात आली होती, ITR दाखल करण्याची अंतिम मुदत देखील वाढवण्यात आली आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने म्हटले आहे की, 2022-23 च्या वर्षासाठी कायद्याच्या कलम 139 च्या उप-कलम (1) अंतर्गत उत्पन्नाचा परतावा सादर करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ती ३१ ऑक्टोबर होती. यात आता 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. देशांतर्गत कंपन्यांनी 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत आर्थिक वर्ष 2021-2022 साठीचे आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे.

Income Tax Return
LIC गुंतवणुकदारांना मिळणार चांगला परतावा, सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

एएमआरजी अँड असोसिएट्सचे संचालक (कंपनी आणि आंतरराष्ट्रीय कर) ओम राजपुरोहित यांनी सांगितले की, मुदत वाढवल्याने सणासुदीच्या काळात खूप आवश्यक दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात सीबीडीटीने लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्याची मुदत सात दिवसांनी वाढवून 7 ऑक्टोबरपर्यंत केली होती.

ज्यांना अंतिम मुदतीपर्यंत कोणत्याही कारणास्तव रिटर्न भरता आले नाही, ते आता 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिटर्न भरू शकतील, परंतु काही अटी असतील. या रिटर्नला विलंबित परतावा, उशीरा परतावा किंवा सुधारित परतावा असे म्हणतात. या अंतर्गत, तुम्ही रिटर्न फाइल कराल परंतु तुम्हाला काही दंड भरण्याबरोबरच व्याज आणि सेट ऑफच्या लाभांपासून वंचित राहावे लागेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.