ITR भरण्याची आज शेवटची तारीख; जाणून घ्या ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया

tax_20return.
tax_20return.
Updated on

नवी दिल्ली- आर्थिक वर्ष 2020-21 चा आयटीआर भरण्याचा आज शेवटचा दिवस (10 जानेवारी) आहे. आज आयटीआर न भरल्यास तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागू शकतो. आयकर विभागाने ट्विट करुन याची माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआर भरण्याची तारीख वाढवून 31 डिसेंबर 2020 आणि 10 जानेवारी 2021 करण्यात आली होती. 

तुम्ही स्वत:ही ऑनलाईन इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करु शकता. त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंटची आवश्यकता लागेल. तुम्हाला फॉर्म 16 A जवळ ठेवावा लागेल. नोकरी करणारे, पेंशनधारक आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांनी बँकेला फॉर्म 15 एच भरुन देणे आणि त्याचा व्याजाचे सर्टिफिकेट घेऊन ठेवणे गरजेचं आहे. तुम्ही आयकरच्या सीमेत येत नाही याचे घोषणापत्र 15 एच फॉर्ममध्ये असते. याशिवाय विमा पॉलिसीचे विवरण पत्र, होम लोन आणि ईएमआय आणि टॅक्ससंबंधी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. 

1. इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग पोर्टलवर जा आणि यूझर आयडी (पॅन नंबर), पासवर्ड टाकून लॉगिन करा.
2. 'e-File' मेन्यूवर क्लिक करा आणि त्यानंतर 'Income Tax Return' लिंकवर क्लिक करा
3. इनकम टॅक्स रिटर्नवर पॅन भरलेलं दिसेल
4. आता असेसमेंट इअर, आयटीआर फॉर्म नंबर, फाइलिंग टाइपमध्ये 'ओरिजिनल/ रिवाइज्ड रिटर्न' निवडा. त्यानंतर सबमिशन मोडमध्ये 'प्रीपेयर अँड सबमिट ऑनलाइन'वर क्लिक करा. 
5. त्यानंतर 'Continue'वर क्लिक करा. आता सर्व निर्देशांना काळजीपूर्वक वाचा आणि फॉर्म वाचल्यानंतर भरा.
6. फॉर्म भरल्यानंतर 'टॅक्स पेड अँड वेरिफिकेशन टॅब'मध्ये उपयुक्त वेरिफिकेशन पर्यायाला निवडा.
7. त्यानंतर 'प्रीव्यू अँड सबमिट' बटनवर क्लिक करा
8. जर तुम्ही 'ई-वेरिफिकेशन'चा पर्याय निवडला असले, तर तुम्ही ईवीसी किंवा ओटीपीपैकी एका पर्यायाच्या माध्यमातून ई-वेरिफिकेशन पूर्ण करु शकता. 
9. जर तुमचा पॅन आधारकार्डसोबत जोडला गेला असेल आणि मोबाईल क्रमांक असेल तर ओटीपीने ई-वेरिफिकेशन पूर्ण करा.
10.  ई-वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आयटीआर सबमिट करु शकता. 

10 जानेवारीनंतर 10 हजार रुपयांचा दंड

जर तुम्ही आयटीआर 10 जानेवारीनंतर भरला, तर तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्याशिवाय टॅक्सपेयर्स, ज्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त नाही, त्यांना लेट फीसच्या रुपात 1 हजार रुपये द्यावे लागू शकतात. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()