आजपासून India Pesticides IPO झाला खुला, पैसे टाकण्याआधी या गोष्टी जाणून घ्या

India Pesticides IPO opens
India Pesticides IPO opensSakal
Updated on

India Pesticides IPO: ऍग्रो केमिकल मॅन्युफॅक्चरर कंपनी इंडिया पेस्टीसाइड (India Pesticides) चा इश्यू आज अर्थात 23 जूनला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. यावर्षी येणारा हा 24 वा IPO असेल. यावर्षी आतापर्यंत 23 कंपन्यांनी एकूण 37,000 कोटी रुपये जमा केले आहेत. कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE दोन्ही ठिकाणी लिस्ट केले आहे. एक्सिस कॅपिटल आणि जेएम फायनान्शिल्स याचे बूक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. (India Pesticides IPO opens: Should you subscribe?)

इश्यूबाबतीत खास माहिती

कंपनी या इश्यूमधून 800 कोटी रुपये जमा करणार आहे. यात 100 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू जारी होईल आणि 700 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल या सेगमेंटमध्ये विकले जातील. ऑफर फॉर सेलमध्ये 281.4 कोटी रुपयांचे शेअर्स प्रमोटर आनंद स्वरूप अग्रवाल आणि 418.6 कोटी रुपयांचे शेअर्स दूसरे शेअरहोल्डर विकणार.

फंडचा वापर नेमका कुठे होणार ?

फ्रेश इश्यूमधील फंडचा वापर कंपनी वर्किंग कॅपिटल आणि कॉर्पोरेट गरजा भागवण्यासाठी करेल.

India Pesticides IPO opens
क्रिप्टो मार्केट कोसळलं! बिटकॉइन, इथेरियममध्ये मोठी मंदी

इश्यूची तारीख

India Pesticides चा इश्यू 23 जून अर्थात आज खुला होणार आणि 25 जूनला बंद होणार आहे. अँकर इनव्हेस्टर्ससाठी इश्यू 22 जूनला एका दिवसासाठी खुला होणार आहे.

प्राइस बँड

कंपनीचा इश्यू प्राइस बँड 290-296 रुपये निश्चित झाला आहे.

शेअर लॉट नेमका काय आहे ?

India Pesticides चा इश्यू लॉट 50 शेअर्सचा आहे. म्हणजे गुंतवणुकरांना कमीत कमी 50 शेअर्सची बोली लावावी लागेल. रिटेल इनव्हेस्टर्स कमीत कमी 14,800 रुपये आणि जास्तीत जास्त 1,92,400 रुपयांची गुंतवणूक करु शकतात.

रिझर्व पोर्शन

कंपनीने एकूण इश्यू साइजचा 50 टक्के क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी रिझर्व ठेवला आहे. इश्यूचे 15 टक्के नॉन इंस्टिट्यूशनल आणि 35 टक्के रिटेलसाठी रिझर्व ठेवले आहे.

India Pesticides IPO opens
येत्या ९ महिन्यात ८० टक्क्यांनी वाढू शकतो 'हा' शेअर

कंपनी पोझिशन

इंडिया पेस्टीसाइड्स Folpet आणि Thiocarbamate Herbicide केमिकलचे उत्पादन करणाऱ्या समावेश जगातील टॉपच्या 5 कंपन्यांमध्ये आहे.

कोणाशी स्पर्धा ?

India Pesticides च्या लिस्टेड पिअर कंपन्यांमध्ये धानुका एग्रोटेक लिमिटेड, भारत रसायन लिमिटेड, यूपीएल लिमिटेड, रॅलिज इंडिया, पीआय इंडस्ट्रीज, सुमितोमो केमिकल इंडिया आणि अतुल इंडिया यांचा समावेश आहे.

India Pesticides IPO opens
Airtel-TCS स्ट्रॅटेजिक पार्टनर, 5G सर्विसच्या दृष्टीने मोठी पावलं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.