थेट परकी गुंतवणूक मिळवण्याच्या बाबतीत भारताने २०२१-२२ मध्ये सरस कामगिरी केली.
नवी दिल्ली - थेट परकी गुंतवणूक मिळवण्याच्या बाबतीत भारताने २०२१-२२ मध्ये सरस कामगिरी केली असून जगभरातील २० आघाडीच्या देशांच्या यादीत भारताने गेल्या वर्षीच्या तुलनेत एका स्थानाची आघाडी घेत सातवे स्थान पटकावले आहे. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या अहवालात ही माहिती देण्यात आल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या पाच देशांमध्ये सिंगापूर (२७.०१%), अमेरिका (१७.९४ %), मॉरिशस (१५.९८ %), नेदरलँड (७.८६ %) आणि स्वित्झर्लंड (७.३१%) यांचा क्रमांक लागतो.
देशात झालेली गुंतवणूक
८१.९६५ अब्ज डॉलर - २०२०-२१
८४.८३५ अब्ज डॉलर - २०२१-२२
गुंतवणूक करणाऱ्या देशांची संख्या
९७ - २०२०-२१
१०१ - २०२१-२२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.