मुंबई : या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) बाळसे धरू लागली आहे आणि जीडीपी (GDP) देखील कोरोनापूर्व काळाएवढा झाला आहे. मात्र ओमिक्रॉनमुळे (Omicron variant) जागतिक अर्थव्यवस्था (International economy) वेठीला धरली गेली आहे, असा इशारा रिझर्व्ह बँकेने (RBI) दिला आहे.
ओमिक्रॉन विषाणूच्या धास्तीमुळे जगात अनेक ठिकाणी नवे निर्बंध येण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे भारतात ग्राहकांचा आत्मविश्वास हळुहळू परत येऊ लागला आहे. मागणीत वाढ दिसत असल्याने अर्थचक्र सुरळित होण्याची चिन्हेही दिसत आहेत. रबीच्या पेरण्यांमध्ये वाढ झाल्याने कृषीक्षेत्राची अवस्था चांगली दिसते आहे. तर उत्पादन आणि सेवाक्षेत्रात नवे उद्योग सुरु होत असल्याने ही क्षेत्रेही सुधारल्याचे जाणवते आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या पत्रकात म्हटले आहे.
ओमिक्रॉनच्या फैलावामुळे जागतिक व्यापारवाढीत खंड पडला आहे तर चलनवाढीच्या धोक्यामुळे विविध देशांची धोरणेही पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे. नोकरभरतीही वेग घेत असताना एकंदर आशावादी चित्र आहे, मात्र ओमिक्रॉनची चिंता आता वाढू लागली आहे. तरीही देशात केंद्र सरकारने वाढवलेला भांडवली खर्च, ग्राहकांची वाढती मागणी व समाधानकारक मॉन्सून यामुळे अर्थचक्र पूर्ववत होण्यास बळ मिळते आहे, असेही रिझर्व्ह बँकेने दाखवून दिले आहे.
ओमिक्रॉनमुळे जागतिक अर्थव्यवस्थांपुढील अनिश्चितता वाढते आहे, मुख्य शहरांमधील क्वारंटाईनची अट व प्रवासावरील निर्बंध पुन्हा लागू होत असताना जागतिक व्यापारासमोरील धोकाही वाढतो आहे. अशातच मालपुरवठ्यावर परिणाम झाला तर मालाच्या किमती व प्रवासखर्च वाढताच राहणार व त्याचा परिणाम निर्यातीवर होईल. देशातील कोरोनाचा फैलाव कमी होत आहे आणि लसीकरणाचा वेगही चांगला आहे. पण ओमायक्रॉनचा धोका असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक असल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.