हॉटेल उद्योगातील कंपनी लेमन ट्री हॉटेल्सच्या शेअर्समध्ये यंदा चांगली वाढ झाली आहे. या वर्षात आतापर्यंत याने 79 टक्के परतावा दिला असून ही तेजी पुढेही कायम राहणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसने या शेअरची किंमत 110 रुपयांपर्यंत पोहोचू शकते असे म्हटले आहे. (Lemon Tree shares)
सध्याच्या किंमतीपेक्षा हे सुमारे 28 टक्के वर आहे. सध्या त्याचे शेअर्स बीएसईवर 86.25 रुपयांवर ट्रेड करत आहेत. सरकार पायाभूत सुविधांवरील खर्च वाढवत आहे, शिवाय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा रुळावर येत आहेत, व्यावसायिक प्रवासात वाढ, वेडींग सिझनमध्ये सुधारणा या सगळ्याचा चांगला परिणाम लेमन ट्रीच्या व्यवसायावर होत आहे.
लेमन ट्री मॅनेजमेंट मॉडल अंतर्गत खोल्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. मिड प्राइस होटल सेग्मेंट, हायर एआरआर मार्केट आणि मॅनेजमेंट काँट्रॅक्ट्सवरील फोकसमुळे मोतीलाल ओसवालचे विश्लेषक या शेअरबाबत सकारात्मक आहेत.
दोन आठवड्यांपूर्वी, 7 ऑक्टोबरला लेमन ट्रीचे शेअर्स 93.50 रुपयांवर होते, जे एका वर्षातील उच्चांक आहे. सध्या त्याची किंमत 86.25 रुपये आहे म्हणजेच सध्या हा शेअर 7.25 टक्के सूटवर मिळत आहे. त्यामुळे हा शेअर विकत घेण्याची ही योग्य संधी असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
लेमन ट्री हॉटेल्स ही देशातील सर्वात मोठी मिड-मार्केट हॉटेल चेन. मालकीच्या आणि भाड्याने घेतलेल्या खोल्यांच्या बाबतीत तिसरी सर्वात मोठी हॉटेल कंपनी आहे. एप्रिल-जून 2022 मध्ये कंपनीने 13.11 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता, तर एक तिमाहीपूर्वी जानेवारी-मार्च 2022 मध्ये कंपनीला 2.63 कोटीचा निव्वळ तोटा झाला होता. महसूलही याच कालावधीत 37.18 कोटी रुपयांवरून 65.36 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.