देशात नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक बेरोजगारी दर; सीएमआयईची आकडेवारी जाहीर

बेरोजगारीचा दर तीन वर्षांतील सर्वोच्च पातळीवर
बेरोजगारी
बेरोजगारीsakal
Updated on

नोव्हेंबरमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 8.0 टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यातील बेरोजगारीचा दर तीन वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. शहरांमधील बेरोजगारीचा दर मागील महिन्यात 7.21 टक्क्यांवर होता तो नोव्हेंबरमध्ये 8.96 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचवेळी ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 8.04 टक्क्यांवरून 7.55 टक्क्यांवर आला आहे. मुंबईस्थित सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE) च्या रोजगार डेटावर अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते बारकाईने लक्ष ठेवतात, कारण सरकार स्वतःची मासिक आकडेवारी जाहीर करत नाही.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे...

दुसरीकडे, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या म्हणजेच NSO च्या आकडेवारीनुसार, शहरी भागात बेरोजगारीचा दर 9.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर आला आहे. सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, शहरी भागातील महिलांमधील बेरोजगारीचा दर जुलै-सप्टेंबर या कालावधीत 11.6 टक्क्यांवरून 9.4 टक्क्यांवर घसरला आहे. एप्रिल-जूनमध्ये तो 9.5 टक्के होता. CMIE च्या डेटावरून असे दिसून आले आहे की, हरियाणामध्ये बेरोजगारी दर सर्वात जास्त आहे.

NSO ने एप्रिल 2017 मध्ये हे सर्वेक्षण सुरू केले. या सर्वेक्षणाच्या आधारे, एक त्रैमासिक बुलेटिन आणले जाते, ज्यामध्ये श्रमशक्तीची आकडेवारी उपलब्ध आहे. यामध्ये बेरोजगारीचा दर, वर्कर पॉपुलेशन रेश्यो (WPR), लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट (LFPR) यांचा समावेश आहे.

बेरोजगारी
Digital Currency : पेटीएम आणि गुगल-पे पेक्षा डिजिटल रुपया का आहे वेगळा? जाणून घ्या

याशिवाय, माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितले की, सरकारने डिजिटल अर्थव्यवस्थेच्या तीन क्षेत्रांमध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, स्टार्टअप आणि आयटी क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. सरकारने पुढील दोन वर्षांत रोजगाराचा आकडा एक कोटींच्या पुढे नेण्याची योजना आखली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.