Nirmala Sitharaman : परकीय कारणांमुळे भारतात महागाई वाढली; सीतारामन यांचं विधान

यूएस-भारत व्यापार आणि गुंतवणूक संधी बैठकीत बोलताना केलं विधान
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSakal
Updated on

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि पुढील 10-15 वर्षांत जगातील तीन प्रमुख आर्थिक शक्तींपैकी एक असेल. भारत-अमेरिका व्यवसाय आणि गुंतवणूक संधी कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिक आर्थिक घडामोडींचा प्रभाव पडत असतो. त्याचबरोबर भारतातील वाढत्या महागाईचे मुख्य कारण जगभरात होत असलेल्या घडामोडी असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आव्हानांना न जुमानता नैऋत्य मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस, सार्वजनिक गुंतवणूक, मजबूत कॉर्पोरेट बॅलन्स शीट, ग्राहक आणि व्यवसायांचा आत्मविश्वास आणि कोविडचा कमी झालेला धोका यामुळे भारत विकासाच्या मार्गावर जाऊ शकला आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. भारताने अलीकडेच ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि पुढील 10-15 वर्षांमध्ये जागतिक स्तरावर पहिल्या तीन आर्थिक शक्तींमध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा आहे.

Nirmala Sitharaman
PM Awas Yojana: PM आवास योजनेबाबत सरकारने केली मोठी घोषणा!

परकीय कारणांमुळे महागाई

यूएस-भारत व्यापार आणि गुंतवणूक संधी बैठकीत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, भारतातील महागाई बाह्य घटकांमुळेनिर्माण झाली आहे. कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या सत्रात त्या म्हणाल्या, कच्च्या तेलाची आयात हे महागाईचे प्रमुख कारण आहे. भारत एकूण कच्च्या तेलाच्या आवश्यकतेपैकी 85 टक्के आयात करतो. बाह्य घटक महागाईवर दबाव आणत आहेत. याबाबत सावध राहण्याची गरज आहे. सीतारामन म्हणाल्या की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालय दोघेही महागाईचा सामना करण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()