बुधवारच्या सत्रात भारतीय शेअर बाजाराने नवीन उच्चांकाला गवसणी घातली खरी मात्र त्याच सत्रात भारतीय शेअर बाजारात नफावसुली देखील पाहायला मिळाली. १५ हजार ८०० या नव्या उच्चांकाला गवसणी घातल्यानंतर दुसऱ्या सत्रात भारतीय शेअर बाजारात नफावसुली आली. ही नफावसुली नेमकी कशामुळे आली हे सांगणं कठीण असल्याचं काही तज्ज्ञ सांगतात. बुधवारी निफ्टी १०५ अंक कोसळून दिवसाअखेर बंद झाला. तर सेन्सेक्सदेखील आज ५२ हजारांच्या खाली घसरलेला पाहायला मिळाला.
Marwadi Shares च्या जय ठक्कर यांनी सांगितलं की, महिन्याच्या दुसऱ्या आठवडी एक्स्पायरी आधीच ही नफा वसुली पाहायला मिळाली. १५ हजार ८०० ही लेव्हल निफ्टीसाठी महत्त्वाचा रेझिस्टन्स म्हणून तयार झाली आहे. निफ्टीसाठी खाली १५ हजार ५७५ आणि १५ हजार ६०० हा लगेचचा सपोर्ट आहे. येत्या काळात निफ्टी आता लाल रंगात ट्रेड करताना पाहायला मिळू शकतो, असंही जय ठक्कर म्हणालेत. ५ हजार ५७५ आणि १५ हजार ६०० या लेव्हलखाली तुटल्यास पुढील मंदी पाहायला मिळू शकते.
Geojit Financial Services च्या विनोद नायर यांनी सांगितलं की, युरोपियन शेअर बाजारांच्या डळमळीत सुरवातीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला पाहायला मिळाला आणि म्हणूनच भारतीय शेअर बाजारात नफा वसुली पाहायला मिळाली. युरोपियन सेंट्रल बँकेच्या पॉलिसीमुळे आणि गुरुवारी अमेरिकेतील महागाईचे आकडे येणार असल्याने जागतिक गुंतवणूकदार काहीशे सावध भूमिका घेताना पाहायला मिळतायत. अमेरिकेतील महागाईचे आकडे काहीशे अधिक राहू शकतात. मात्र महागाई जास्त काळ राहणार नाही असंही बोललं जातंय. जर या दोन्ही गोष्टी खऱ्या ठरल्यात तर शेअर बाजाराला लवकर दिलासा मिळू शकतो.
आज वायदा बाजारातील महिन्याची दुसरी विकली एक्स्पायरी असल्या कारणामुळे आजच्या दिवशी बाजारात सावध भूमिका घेऊन ट्रेड करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातोय. कालच्या सत्रात नफा वसुली जरी पाहायला मिळाली असली तरीही काही शेअर्समध्ये चांगली खरेदी देखील पाहायला मिळाली. पवारग्रीड, SBI कार्ड्स, टाटा पावर, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, रेक लिमिटेड (RECLTD) या कालच्या टॉप गेनर्स वर आजही लक्ष ठेवायला हवं.
या सोबतच भारतात मान्सूनचं दमदार आगमन झालं आहे. अशात शेतीशी निगडित अवजारे बनवणाऱ्या कंपन्या, ट्रॅक्टर कंपन्या आणि खतांशी निगडित कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.