नोकरीच्या सुरुवातीलाच फायनान्शिअल प्लानिंग केलं तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. पण असं का? जाणून घेऊयात...
SIP Return After Inflation :
घर खरेदी, मुलांचे शिक्षण, लग्न तसेच स्वतःची रिटायरमेंटही तेवढीच महत्त्वाची आहे. या सगळ्यात महागाई हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. कारण चूक नेमकी इथेच होते. जाणून घेऊयात महागाईचा तुमच्या सेव्हिंग्स अर्थात बचतीवर नेमका कसा परिणाम होतो. (Inflation puts an end to your savings What will be the value after 15 years)
एक उदाहरण घेऊया, एका सॅलरीड व्यक्तीचे वय 30 वर्ष आहे, त्याला 18 किंवा 20 वर्षांनंतर मुलांच्या हायर एज्युकेशनवर खर्च करावा लागणारच. पुढे आणखी 25 वर्षांनंतर मुलाच्या लग्नासाठी सेव्हिंग्स करायची आहे. मग पुढे 30 वर्षांनी स्वतःच्या रिटायरमेंटचा विचार करायचा आहे. आता जर तुम्हाला रिटायरमेंटसाठी 1 कोटी खूप वाटत असतील तर तुम्ही चुकीचा विचार करताय, कारण 25 वर्षांनंतर परिस्थिती अगदीच वेगळी असेल. दरवर्षी 5 ते 6 टक्क्यांनी महागाईचा दर वाढत आहे, त्यामुळे आजच्या 1 कोटीची व्हॅल्यू चक्क अर्ध्यावर येईल.
20 वर्षांसाठी कॅलक्युलेटर: विना महागाई एडजस्ट करुया
मासिक गुंतवणूक: 10,000 रुपये
गुंतवणूकीचा कार्यकाळ: 20 वर्ष
रिटर्न : 12 टक्के
20 वर्षांनंतर एसआयपीची व्हॅल्यू: 1 कोटी
20 वर्षांसाठी कॅलक्युलेटर: विना महागाई एडजस्ट करुया
मासिक गुंतवणूक: 10,000 रुपये
गुंतवणूकीचा कार्यकाळ: 20 वर्ष
रिटर्न (अंदाजे) : 12 टक्के
महागाई: वार्षिक 6 टक्के
20 वर्षात महागाई एडजस्ट केल्यानंतर तुमच्या 1 कोटीची व्हॅल्यू असेल 46 लाख रुपये. याच पद्धतीने आपण 25 वर्ष आणि 15 वर्षांनंतर काय होऊ शकते पाहुयात.
25 वर्षांसाठी कॅलक्युलेटर: विना महागाई एडजस्ट करुया
मासिक गुंतवणूक: 10,000 रुपये
गुंतवणूकीचा कार्यकाळ: 25 वर्ष
रिटर्न (अंदाजे): 12 टक्के
25 वर्षांनंतर SIP ची व्हॅल्यू: 1.9 कोटी
25 वर्षांसाठी कॅलक्युलेटर: महागाई एडजस्ट केल्यानंतरची स्थिती
मंथली गुंतवणूक: 10,000 रुपये
गुंतवणूकीचा काळ: 25 वर्ष
रिटर्न (अंदाजे) : 12 टक्के
महागाई: वार्षिक 6 टक्के
25 वर्षांनतर महागाई एडजस्ट केल्यानंतर SIP व्हॅल्यू असेल 69 लाख रुपये.
15 वर्षांसाठी कॅलक्यूलेटर: विना महागाई एडजस्ट करुया
मंथली गुंतवणूक: 10,000 रुपये
गुंतवणूकीचा काळ: 15 वर्ष
रिटर्न (अंदाजे): 12 टक्के
15 वर्षांनंतर SIP ची व्हॅल्यू: 51 लाख रुपये
15 वर्षांसाठी कॅलक्युलेटर: महागाई एडजस्ट केल्यानंतर
मंथली गुंतवणूक: 10,000 रुपये
गुंतवणूकीचा काळ : 15 वर्ष
रिटर्न (अंदाजे): 12 टक्के
महागाई: वार्षिक 6 टक्के
15 वर्षांत महागाई एडजस्ट केल्यानंतर व्हॅल्यू: 29 लाख रुपये
जास्त SIP रिटर्न देणारे म्यूचुअल फंड
20 वर्षांचा विचार केला तर निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडने 1995 मध्ये लॉन्च झाल्यानंतर वार्षिक 22 टक्के रिटर्न दिले आहेत. तर SBI लार्ज एँड मिडकॅप फंडने 1993 मध्ये लॉन्च झाल्यानंतर वार्षिक 15 टक्के रिटर्न दिला आहे. DSP इक्विटी अपॉर्चुनिटी फंडने मागच्या 20 वर्षात 18 टक्के सीएजीआरच्या हिशोबाने रिटर्न दिला आहे. तर HDFC टॉप 100 फंडने मागच्या 25 वर्षात 19 टक्के रिटर्न दिलेत. मार्केटमध्ये असे बरेचसे फंड्स आहेत ज्यात जास्त काळासाठी वार्षिक 12 ते 15 टक्के रिटर्न मिळतो आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.