Infosys ची मोठी घोषणा... लवकरच 55,000 जणांची नोकरभरती

Infosys SEO again targeted by employees
Infosys SEO again targeted by employees
Updated on

Infosys Recruitment Drive 2022: देशभरातील आयटी कंपन्यामध्ये कोरोना काळात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचं पाहायला मिळालं. वर्क फ्रॉम होम संस्कृती आयटीच्या पथ्यावर पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात देशातील आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी देत आहे. एका व्यवसायिक आहवालानुसार या वर्षी भारतातील आयटी क्षेत्रात नव्याने अडीच लाखांच्या आसपास नोकऱ्या उपलब्ध होतील. यातच अग्रगण्य भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसने आणखी एक घोषणा केली आहे. (Infosys to recruit 55 thousand freshers in 2022)

या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत 5 हजार 809 कोटी रुपयांचा नफा जाहीर केल्यानंतर, भारतातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी Infosysने मोठी घोषणा केली. कंपनीच्या जागतिक पदवीधर भरती कार्यक्रमाचा भाग म्हणून आर्थिक वर्ष 2022मध्ये कंपनी 55हजार नव्या कर्मचाऱ्यांना संधी देणार आहे. म्हणजेच Infosys फ्रेशर्सची मोठ्या प्रमाणात भरती करण्याची योजना आखत आहे.

विविध वृत्तसंस्थांना तपशील देताना, मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय म्हणाले की, आयटी फर्मने संपादन आणि विकासामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देणं सुरू ठेवलं आहे.आणि बाजारतील वाढीच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी देण्यासाठी आर्थिक वर्ष 22 साठी जागतिक पातळीवर नोकरभरती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये जवळपास 55 हजार नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं जाहीर केलंय.

नव्या अहवालानुसार डिसेंबर 2021 पर्यंत Infosys मध्ये एकूण 2 लाख 92 हजार 067 कर्मचारी होते. हे मागीत तिमाहीत 2 लाख 79, हजार 617 आणि डिसेंबर 2020 पर्यंत 2 लाख 49 हजार 312 असल्याची माहिती समोर आली आहे.

इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलील पारेख म्हणाले की, कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिभेला चालना देण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. या अंतर्गत आम्ही ग्राहकांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या कार्यक्षमतेवर भर देत आहोत. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचाही आमच्या प्राधान्यक्रमात समावेश आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.