Small Saving Rate Hike : सरकारकडून नववर्षाचं मोठं गीफ्ट! तुमच्या बचतीवर मिळणार घसघशीत व्याज

Small Saving Rate Hike
Small Saving Rate Hike
Updated on

Small Saving Rate Hike : सरकारने अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिस ठेव योजना, NSC आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजन (Senior Citizen Saving Schemes) यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

वित्त मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्च या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान PPF, सुकन्या समृद्धी योजना ( Sukanya Samridhi Yojana) वर देऊ केलेल्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

व्याजदरात किती वाढ झालीय?

बचत योजना - तिसऱ्या तिमाहीत व्याज - चौथ्या तिमाहीचे व्याज

सेव्हिंग डिफॉझिट - 4.00% - 4.00%

1 वर्ष ठेव - 5.50% - 6.60%

2 वर्षांची ठेव - 5.70% - 6.8%

3 वर्षांची ठेव - 5.8 % - 6.9%

5 वर्षांची ठेव - 6.7% - 7.0%

5 वर्षांची रेकरिंग ठेव - 5.80% - 5.80%

ज्येष्ठ नागरिक बचत - 7.60% - 8.00%

मासिक उत्पन्न खाते - 6.70% - 7.10%

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट - 6.80% - 7.00%

पीपीएफ (ppf) - 7.10% - 7.10%

किसान विकास पत्र - 7.0% (123 महिने) - 7.2% (120 महिने)

सुकन्या समृद्धी योजना - 7.60% - 7.60%

Small Saving Rate Hike
Rishabh Pant Accident : पंतच्या अपघातानंतर विराट कोहलीचा खास संदेश, ट्विट करत म्हणाला...

पीपीएफ, सुकन्या योजनेवर व्याजदर जैसे थे

वित्त मंत्रालयाने जानेवारी ते एप्रिल या तिमाहीसाठी पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (PPF) वर 7.1 टक्के व्याज मिळत राहील, सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याज मिळत राहील. पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या रेकरिंग डिपॉझिटवर 5.80 टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.

Small Saving Rate Hike
SSC-HSC Exam 2023 : विद्यार्थ्यानो लागा तयारीला! 10वी-12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 'येथे' पाहा तारखा

RBI ने सलग पाच वेळा पतधोरण बैठकीनंतर पॉलिसी रेट्स रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. 8 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 2022 मध्ये रेपो रेट 4 टक्क्यांवरून 6.25 टक्के झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()