देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) गेल्या दोन दशकात आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई दिली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 2000 सालाच्या सुमाराला आयसीआयसीआय बँकांच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, ते आज कोट्यधीश झालेत. आयसीआयसीआय बँकेने गेल्या 23 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 220 पट वाढ केली आहे. (invest money in icici bank become Billionaire)
ICICI बँकेचे शेअर्स गुरुवारी, 8 सप्टेंबरला नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) 899.60 रुपयांवर बंद झाले. पण, 1 जानेवारी 1999 रोजी, जेव्हा आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सने एनएसईवर पहिल्यांदाच व्यवहार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याची किंमत फक्त 4.08 रुपये होती. म्हणजेच गेल्या 23 वर्षांत, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 21,950 टक्के इतका तगडा परतावा दिला आहे.
याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 जानेवारी 1999 रोजी 1 लाख रुपये गुंतवून आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स खरेदी केले असते, तर आज त्या 1 लाख रुपयांचे 2 कोटी 20 लाख झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये फक्त 50,000 रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 50,000 रुपयांचे मूल्य 1 कोटी 10 लाख रुपये झाले असते.
आयसीआयसीआय बँकेच्या स्टॉकच्या अलीकडील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या एका महिन्यात सुमारे 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात त्याची किंमत 24.90 टक्क्यांनी वाढली आहे. तर गेल्या 5 वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 208.50 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
आणखी 35% वाढ अपेक्षित
मॉर्गन स्टॅन्लेच्या विश्लेषकांनी जारी केलेल्या नोटमध्ये जवळपास संपूर्ण बँकिंग क्षेत्राचे पुनर्मूल्यांकन केले होते. मात्र, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. मॉर्गन स्टॅनलीने आयसीआयसीआय बँकेचेसाठी टारगेट 1,040 रुपयांवरून 1,225 रुपये केले आहे. ही किंमत आयसीआयसीआय बँकेच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा सुमारे 35 टक्के अधिक आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.