बजेटपूर्वी टाटा समूहाच्या 'या' स्टॉकमध्ये पैसे गुंतवा, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

टाटा समूहाची ही सर्वोत्कृष्ट रिअल इस्टेट कंपनी
TATA groups
TATA groupsesakal
Updated on

Budget 2022 Stock: 2022 चा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. यावेळी अर्थसंकल्पातून ज्या क्षेत्राला मोठा आधार मिळणार आहे, त्यात रिअल इस्टेट आणि इन्फ्रा क्षेत्राचाही समावेश आहे. सध्या रिअल इस्टेटमध्ये चांगली मागणी आहे. अशा परिस्थितीत सरकार अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा करून या क्षेत्राला चालना देऊ शकते. त्यामुळेच रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित काही शेअर्स पुढे जाऊन चांगली कामगिरी करू शकतात. जर तुम्ही बजेटपूर्वी या क्षेत्राशी संबंधित एखादा चांगला स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही हेमिस्फेअर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेडवर (Hemisphere Properties India Ltd) विचार करु शकता... टाटा समूहाची ही सर्वोत्कृष्ट रिअल इस्टेट कंपनी आहे, ज्याचे फंडामेंटल्स अतिशय मजबूत आहेत. (Invest money in Tata Group stock before the budget know the opinion of experts)

TATA groups
केस कापल्यावर रक्त का येत नाही? घामाला दुर्गंध कसा येतो?

अंदाजे किती रिटर्न मिळेल ?

हेमिस्फेअर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेडवर (Hemisphere Properties India Ltd) ही एक उत्तम निवड असल्याचे शेअर बाजार तज्ज्ञ अनिल सिंघवी म्हणाले. रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या तेजी सुरू आहे. अर्थसंकल्पातही या क्षेत्रासाठी मोठी तरतूद अपेक्षित आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात कोणत्या कंपनीकडे किती जमीन आहे हे पाहिले जाते. यात हेमिस्फेअर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेड (Hemisphere Properties India Ltd) सगळ्यात चांगल्या स्थितीत आहे. कारण कंपनीच्या लँड बँकेचे मूल्य 19000 कोटी ते 20000 कोटी दरम्यान आहे. तर मार्केट कॅप सुमारे 3800 कोटी रुपये आहे. या कंपनीत टाटा समूहाचा हिस्सा 22.5 टक्के आहे. अनिल सिंघवींनी या स्टॉकसाठी 180 रुपये, 200 रुपये आणि 250 रुपये असे 3 टारगेट दिले आहेत.

रिअल इस्टेटसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता

टाटा समूहाची कंपनी हेमिस्फियर प्रॉपर्टीज इंडिया ही एक रिअल इस्टेट कंपनी आहे. जर रिअल इस्टेटला पायाभूत सुविधांचा दर्जा मिळाला, तर हेमिस्फेअर प्रॉपर्टीजसाठी खूप फायदेशीर ठरेल. यामध्ये गुंतवणूकदार आल्यास कर सवलती मिळतील, तर क्रेडिट स्वस्त दरात मिळेल.

TATA groups
दहा हजार घोड्यांचा ‘जीव टांगणीला’

कंपनीजवळ मोठी लँड बँक

Hemisphere Properties India मध्ये मोठी लँड बँक आहे. कंपनीला टाटा कम्युनिकेशन्सकडून 740 एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. यापैकी, सुमारे 540 एकर जमीन फक्त पुण्यात आहे, जिथे रेसिडेन्शिययस रिअल इस्टेटमध्ये प्रचंड वाढ होत आहे. या जमिनीचा आणखी विकास करण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी कंपनी टाटा हाउसिंग आणि टाटा कन्स्ट्रक्शनसोबत काम करू शकते. शेअरचे व्हॅल्युएशन अतिशय आकर्षक आहे. आता हे शेअर घेणे लाभदायक ठरू शकते, कारण येत्या काळात यात मजबूत वाढ अपेक्षित आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.