LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये दरमहा मिळेल 12 हजार रुपये पेन्शन!

सरल पेन्शन योजनेचे फायदे आणि तुम्हाला त्यात किती पैसे गुंतवावे लागतील ते जाणून घेऊयात.
Money
MoneyGoogle
Updated on
Summary

सरल पेन्शन योजनेचे फायदे आणि तुम्हाला त्यात किती पैसे गुंतवावे लागतील ते जाणून घेऊयात.

जर तुम्हाला स्वतःसाठी पेन्शन (Pension) योजनेत गुंतवणूक (Investment) करायची असेल, तर तुम्ही एलआयसीच्या (LIC) सरल पेन्शन योजनेत पैसे जमा करू शकता. LIC च्या सरल पेन्शन प्लॅनमध्ये, (Saral Pension Yojna) तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल. त्यानंतर, 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 12000 रुपये पेन्शन मिळेल. तुम्हाला हे पेन्शनचे पैसे आयुष्यभर मिळतील. सरल पेन्शन योजनेचे (Saral Pension Yojna) फायदे आणि तुम्हाला त्यात किती पैसे गुंतवावे लागतील ते जाणून घेऊयात.

Money
LIC चा मेगा IPO या आर्थिक वर्षात येण्याची शक्यता कमीच; सूत्रांची माहिती

एलआयसी सरल पेन्शन योजनेचे नियम

लाइफ एन्युटी विथ 100 पर्सेंट रिटर्न ऑफ पर्चेस प्राइस (Life Annuity with 100 percent return of purchase price) ही पेन्शन सिंगल लाईफसाठी आहे, म्हणजेच ही पेन्शन योजना एका व्यक्तीशी जोडली जाईल. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळत राहील. त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.

पेन्शन योजनेचे फायदे - पेन्शन योजना जॉइंट लाइफसाठी दिली जाते. यामध्ये पती-पत्नी दोघांना पेन्शन मिळते. यामध्ये जो जास्त काळ जगतो त्याला पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही नसतील तेव्हा नॉमिनीला मूळ किंमत मिळेल.

Money
LIC IPO गुंतवणूकदारांनी सबस्क्राईब करावे की नाही?

सरल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये…

1. विमाधारकासाठी, पॉलिसी घेतल्याबरोबर त्याचे पेन्शन सुरू होईल.

2. आता तुम्हाला पेन्शन दर महिन्याला हवी की त्रैमासिक, सहामाही की वार्षिक हवी हे तुमच्यावर अवलंबून आहे. हा पर्याय तुम्हाला स्वतः निवडावा लागेल.

3. ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेता येते.

4. या योजनेत किमान 12 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

5. ही योजना 40 ते 80 वयोगटातील लोकांसाठी आहे.

6. या योजनेत, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर कधीही कर्ज मिळेल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.