टाटा ग्रुपच्या या दोन शेअर्सचा 2 वर्षांत 340% परतावा दिला...

टाटा ग्रुपच्या शेअर्सने गेल्या दोन वर्षांत चांगला परतावा दिला आहे.
Tata Steel and Tata Steel Stocks
Tata Steel and Tata Steel StocksSakal
Updated on

Investment in Tata Steel and Tata Steel Stocks: मागच्या काही महिन्यांत शेअर बाजारात अतिशय अस्थिर वातावरण राहिले, अनेक शेअर्सची पडझड झाली, पण तहीही टाटा ग्रुपच्या शेअर्सने गेल्या दोन वर्षांत चांगला परतावा दिला आहे. विशेषत: 23 मार्च 2020 रोजी बाजारातील नीचांकी स्थितीनंतर, काही शेअर्सनी जोरदार परतावा दिला आहे. टाटा स्टील (Tata Steel) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे शेअर्स त्यापैकीच एक आहेत.

सध्याच्या मंदीच्या बाजारात, टाटा ग्रुपचे हे दोन शेअर्स त्यांच्या 52आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. पण तरीही या दोन्ही शेअर्सनी गेल्या दोन वर्षांत त्यांच्या गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट केले.

Tata Steel and Tata Steel Stocks
भक्कम फंडामेंटल असणारा हा स्वस्त स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत आहे का ?

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)

TCS चे शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी 3036 रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहेत, जे त्यांच्या सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 350 रुपयांनी कमी आहे. मार्च 2020 मध्‍ये बाजारातील घसरणीनंतर जर आपण TCS शेअर्सच्या किमतीवर एक नजर टाकली तर, टाटा ग्रुपचा हा शेअर अजूनही मजबूत पोर्टफोलिओ स्टॉक आहे, कारण गेल्या दोन वर्षांत त्याने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

टाटा स्टील (Tata Steel)

मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गेल्या एका महिन्यात टाटा स्टीलमध्ये (Tata Steel) सुमारे 18 टक्के वाढ झाली आहे. कमोडिटीच्या किमती विक्रमी उच्चांकावर गेल्यानंतर स्टॉकची जोरदार विक्री होत आहे. सोमवारी, टाटा स्टीलच्या शेअरची किंमत NSE वर इंट्राडे नीचांकी 1094 रुपयांवर होती. ही किंमत NSE वर 52 आठवड्यांच्या नीचांकी 1050 रुपयांवरून 44 रुपयांनी वाढली आहे. सोमवारी टाटा स्टीलचा शेअर NSE वर 1109 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

Tata Steel and Tata Steel Stocks
हा शुगर स्टॉक देईल तगडा परतावा, एक्स्पर्ट्सना विश्वास...

गेल्या दोन वर्षांत टाटा स्टील (Tata Steel) स्टॉकने 340 टक्के परतावा दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी टाटा स्टीलचे शेअर्स NSE वर 253 रुपयांवर बंद झाले. तर सोमवारी तो 1109 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे नुकत्याच झालेल्या विक्रीचा मोठा फटका बसला असूनही, जवळपास दोन वर्षांत तो 856 रुपये प्रति शेअर वाढले आहे.

मार्च 2020 मध्ये बाजारातील बॉटम लेव्हलला पोहोचल्यानंतरही, या दोन्ही टाटा ग्रुपच्या शेअर्सनी 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या जवळपास असूनही, त्यांच्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.