वयाची 21 वर्ष पुर्ण झालीत? आज गुंतवणूक करा अन् मिळवा मोठा फायदा

21 व्या वर्षापासून सुरु करा NPSमध्ये गुंतवणूक
National-Pension-Scheme
National-Pension-Schemeesakal
Updated on
Summary

21 व्या वर्षापासून सुरु करा NPSमध्ये गुंतवणूक

तुम्हाला रिटायरमेंटनंतरही नियमित उत्पन्न हवे असेल, तर त्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. आज अनेक प्रकारच्या पेन्शन योजना आहेत, ज्यात गुंतवणूक (Investment) करुन तुम्ही येणारा काळ सुरक्षित करू शकता. यापैकीच एक राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अर्थात (NPS) आहे.

वयाच्या 21 व्या वर्षी गुंतवणूक करा सुरु

- मासिक गुंतवणूक 4,500 रुपये करता येतील

- तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत 39 वर्ष सतत गुंतवणूक (Investment) करावी लागेल.

- या योजनेत वार्षिक 54000 रुपये आणि 39 वर्षांत 21.06 लाख रुपयांची एकूण गुंतवणूक होईल.

- सरासरी 10 टक्के परतावा असेल, तर मॅच्युरिटीवर 2.59 कोटी इतका मोठा फंड तयार होईल.

- म्हणजेच निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 51,848 रुपये पेन्शन मिळेल.

- रिटायरमेंट लगेट 1.56 कोटी मिळतील

National-Pension-Scheme
रिटायर झालात तर मग चिंता कसली? NPS Scheme असल्यावर निवांत राहा

NPS मध्ये 40 टक्के अॅन्युइटीचा पर्याय आहे. अशा परिस्थितीत, 6 टक्के वार्षिक दराने रिटायरमेंटनंतर, 1.56 कोटी रुपयांची एकरकमी रक्कम मिळेल. बाकी 1.04 कोटी रुपये अॅन्युइटीमध्ये जातील. आता या अॅन्युइटी रकमेतून तुम्हाला दरमहा 51,848 रुपये पेन्शन मिळेल. अॅन्युइटीची रक्कम जितकी जास्त असेल तितकी पेन्शन जास्त असेल.

1000 रुपये देऊन खाते उघडा

- NPS टियर-1 आणि टियर-2 अंतर्गत दोन प्रकारची खाती उघडली जातात.

- टियर-1 हे रिटायरमेंटचे खाते आहे, तर टियर-2 हे वॉल्युंटरी खाते आहे

- ज्यामध्ये कोणतीही पगारदार व्यक्ती गुंतवणूक सुरू करू शकते.

- टियर-1 खाते उघडल्यानंतरच टियर-2 खाते उघडले जाते.

- एनपीएस टियर-1 चालू ठेवण्यासाठी वार्षिक योगदान 6,000 रुपयांवरून 1,000 रुपये करण्यात आले आहे.

- तुम्ही ही गुंतवणूक वयाच्या 65 वर्षापर्यंत करु शकता.

- NPS गुंतवणुकीवर 40 टक्के एन्युइटी खरेदी करणे आवश्यक आहे.

- 60 वर्षांनंतर 60 टक्के रक्कम एकरकमी काढता येते.

- किमान वार्षिक गुंतवणूक न केल्यास, खाते फ्रीज करुन निष्क्रिय केले जाते.

National-Pension-Scheme
फिनटेक : ई-इन्व्हॉइसिंग आणि ई-बिल प्रणाली

NPS ऑनलाइन उघडू शकता

NPS खाते उघडण्यासाठी, Enps.nsdl.com/eNPS किंवा Nps.karvy.com या संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती भरा आणि अगदी सहज तुमचे NPS खाते सुरु होईल.

टॅक्स सूट

NPS मध्ये, ग्राहकांना टॅक्स सवलतीची सुविधा मिळते. आयकर कलम 80CCD(1), 80CCD(1b) आणि 80CCD(2) अंतर्गत ही टॅक्स सूट उपलब्ध आहे. कलम 80C व्यतिरिक्त, म्हणजेच NPS वर 1.50 लाख रुपयांशिवाय तुम्ही आणखी 50,000 रुपयांची सूट घेऊ शकता. NPS मध्ये गुंतवणूक करून तुम्ही एकूण 2 लाख रुपयांची आयकर सवलत मिळवू शकता.

पोर्टेबल सिस्टम

तुम्ही तुमचे NPS खाते ट्रान्सफर करू शकता. तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्याचे लोकेशन बदलू शकता.

ऑनलाइन ऍक्सेस

मोबाईल ऍप्लिकेशन आणि सिस्टीमद्वारे तुम्ही एनपीएस अकाऊंटला ऑनलाइन ऍक्सेस करू शकता. म्हणजेच याबाबतची सर्व कामे एका क्लिकवर घरबसल्या होतील, कुठेही जायची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.