Investment Tips : 'या' मल्टीबॅगर शेअरने दिला बक्कळ परतावा

शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा नफा मिळतो. शेअर बाजारात शहाणपणाने गुंतवणूक केली नाही तर नुकसानही होऊ शकते.
Investment Tips
Investment Tipsesakal
Updated on

Investment Tips : शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत ज्यात अगदी कमी कालावधीत मजबूत तेजी येते आणि ती कायम राहते. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा नफा मिळतो. पण तुम्ही शेअर बाजारात शहाणपणाने गुंतवणूक केली नाही तर तुमचे नुकसानही होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. गेल्या 5 वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना 1,517 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे.

आम्ही क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेड (Quint Digital Media Ltd) या स्मॉल-कॅप कंपनीबाबत बोलत आहोत. कंपनीचे मार्केट कॅप 666.67 कोटी आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी होणार कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक होणार आहे. 7 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या विद्यमान भागधारकांना इक्विटी शेअर्स जारी करण्यास मान्यता दिल्याचे स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे.

Investment Tips
Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेडने कंसोलिटेडेड आधारावर Q2FY23 साठी 19.73 कोटीच्या ऑपरेशन्समधून एकूण महसूल नोंदवला, जो मागील दुसऱ्या तिमाहीपेक्षा 37% अधिक आहे. क्विंट डिजिटल मीडियाचा सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत निव्वळ तोटा 3.18 कोटी होता, जो 2FY23 च्या तिमाहीत 4.55 कोटी होता.

Investment Tips
Top Shares : 'या' शेअरमध्ये तगडा परतावा, तीन वर्षात 1 लाखाचे 10 लाख

क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेडचे शेअर्स सध्या 304.00 रुपयांवर ट्रेड करत आहे. तांत्रिक चार्टवरील 20-दिवसांच्या सरासरी व्हॉल्यूमच्या तुलनेत, कंपनीचे एकूण 2,009 शेअर्स होते. या शेअरने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 1,517.02 टक्के आणि गेल्या तीन वर्षांत 318 टक्के इतके मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात स्टॉक 12.0% घसरला असला तरी येत्या काळात याच मजबूत तेजी येण्याचा विश्वास मार्केट एक्सपर्ट व्यक्त करत आहेत.

Investment Tips
Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.