ऑनलाईन फूड डिलेव्हरी अॅप्लिकेशन 'झोमॅटो'ला अखेर IPO बाजारात आणण्याची परवानगी मिळाली आहे. SEBI म्हणजेच सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून ही परवानगी मिळाली आहे. झोमॅटो आपल्या IPO च्या माध्यमातून तब्बल 8,250 कोटी रुपयांचं भांडवल जमा करणार आहे. आपला IPO बाजारात आणण्यासाठी खरंतर मार्च महिन्यातच झोमॅटोकडून सेबीकडे Draft Red Herring Prospectus (DRHP) दाखल करण्यात आला होता. त्यामुळे याच महिन्यात झोमॅटोची भारतीय शेअर बाजारात लिस्टिंग होऊ शकते. गेल्या वर्षभरात आलेल्या विविध IPO पैकी झोमॅटोचा IPO हा सर्वात मोठा IPO असू शकतो. हा देशातील एका स्टार्टअपकडून येणारा सर्वात मोठा IPO असणार आहे. (IPO application of zomato sebi givse green flag read details about issue)
8 हजार 250 कोटींचा IPO
झोमॅटोने दाखल केलेल्या DRHP मधील माहितीनुसार कंपनी 8 हजार 250 कोटी रुपयांचं भांडवल गोळा करणार आहे. त्यातील 7 हजार 500 कोटी रुपये हे फ्रेश इश्यूमध्ये गोळा करण्यात येणार आहे तर 750 कोटी रुपये हे OFS म्हणजेच ऑफर फॉर सेल च्या माध्यमातून उभे केले जाणार आहेत. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून कंपनीतील काही गुंतवणूकदार आपला हिस्सा विकतात. इन्फोइज कंपनीकडून आधीच सांगण्यात आलं आहे की कंपनी झोमॅटोमधील त्यांचा 750 कोटींचा हिस्सा विकणार आहे. या इश्यूची साईझ मोठी असल्याने जूने गुंतवणूकदार लिस्टिंग नंतर चांगल्या किमतीत आपले शेअर्स विकून शकतात. ऑफरमध्ये येणाऱ्या प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू १ रुपये ठेवण्यात आली आहे.
रिटेल गुंतवणूकदारांसाठी केवळ 10 टक्के
झोमॅटोचा येणारा IPO हा तोट्यातील कंपन्यांसाठी निश्चित केलेल्या नियमांनुसार येणार आहे. त्यामुळे हा IPO इतर IOP च्या प्रकारांपेक्षा जरा वेगळा असणारा आहे. अशा आयपीओमध्ये फायद्यात असणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा कमी असतो. सामान्यतः IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा राखीव असतो. मात्र, ही तोट्यातील कंपनी असल्याने रिटेल गुंतवणूकदारांसाठी केवळ 10 टक्के IPO कोटा राखीव आहे.
Zomato मध्ये इन्फोएज आणि सिकोया कॅपिटल गुंतवणूकदार
नुकतंच झोमॅटोनी स्वतःला प्रायव्हेट कंपनीतून पब्लिक कंपनीत रूपांतरित केलं आहे. कंपनीने आपल्या मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशनमध्ये बदल केला. झोमॅटोमध्ये सध्या अॅन्ड फायनॅन्शियल्स, सिकोया कॅपिटल, उबर यांची गुंतवणूक आहे. कंपनीची अपेक्षा आहे की वाढती शहरी लोकसंख्या, इंटरनेट आणि स्मार्टफोनची वाढती मागणी यामुळे कंपनीचा व्यवसाय वाढतच जाईल.
(नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.