कमाईच्या 23 संधी! येताहेत बाबा रामदेवांपासून अदानींचे IPO बाजारात

कमाईच्या 23 संधी! येताहेत बाबा रामदेवांपासून अदानींचे IPO बाजारात
ipo
ipo Sakal
Updated on
Summary

चालू जानेवारी ते मार्च या तिमाहीत प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी (IPO) बाजार गजबजलेला राहील.

चालू जानेवारी ते मार्च या तिमाहीत प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी (Initial Public Offering - IPO) बाजार गजबजलेला राहील. या तिमाहीत 23 कंपन्या आयपीओद्वारे 44 हजार कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. मर्चंट बॅंकर्सनी (Merchant Bankers) ही माहिती दिली. तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या आयपीओमधून निधी उभारण्यात आघाडीवर असतील. (IPOs of Baba Ramdev and Adani's companies are coming to market)

ipo
राज्यसेवेची पूर्वपरीक्षा फेब्रुवारीत? 'या' दिवशी येणार वेळापत्रक

2021 मध्ये 63 कंपन्यांनी जमा केले IPO साठी 1.2 लाख कोटी

यापूर्वी 2021 मध्ये 63 कंपन्यांनी IPO द्वारे 1.2 लाख कोटी रुपयांची विक्रमी रक्कम जमा केली होती. तथापि, या काळात Covid-19 मुळे मॅक्रो इकॉनॉमी (Macro Economy) प्रभावित राहिली. या कंपन्यांव्यतिरिक्त, POWERGRID INVIT ने IPO द्वारे 7,735 कोटी रुपये उभे केले, तर ब्रुकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टने REIT (Real Estate Investment Trust) द्वारे 3,800 कोटी रुपये उभे केले.

येत आहेत हे आयपीओ

मर्चंट बॅंकर्सनी सांगितले की, मार्च तिमाहीत कंपन्यांकडून IPO द्वारे निधी उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यात OYO (रु. 8,430 कोटी) आणि पुरवठा साखळी कंपनी डेल्हीवेरी (रु. 7,460 कोटी) यांचा समावेश आहे. याशिवाय अदानी विल्मर (Adani Wilmer) (रु. 4,500 कोटी), इमक्‍योर फार्मास्युटिकल्स (Emcure Pharmaceuticals) (रु. 4,000 कोटी), वेदांत फॅशन्स (Vedanta Fashions) (रु. 2,500 कोटी), पारादीप फॉस्फेट्‌स (Paradip Phosphates) (2,200 कोटी), मेदांता (Medanta) (2,000 कोटी) आणि झिगो (Zigo) (800 कोटी रुपये) यांचे IPO देखील तिमाही दरम्यान आगमन होणे अपेक्षित आहे.

ipo
'आधार'वरील फोटो आवडला नाही? झटक्‍यात बदलण्याचा 'हा' सोपा मार्ग

मर्चंट बॅंकर्स म्हणाले, की स्कॅनरे टेक्‍नॉलॉजीज (Scanner Technologies), हेल्थियम मेडटेक (Healthium Medtech) आणि सहजानंद मेडिकल टेक्‍नॉलॉजीज (Sahajanand Medical Technologies) देखील पुनरावलोकनाधीन तिमाहीत IPO लॉंच करू शकतात. रिकूर क्‍लबचे संस्थापक म्हणाले एकलव्य (Eklavya), कंपन्यांद्वारे आयपीओ सूची लोकांकडून भांडवल उभारण्यासाठी केली जाते, ज्यामुळे त्यांच्या समभागांची तरलता वाढते तसेच मूल्य शोधण्यात मदत होते. learnapp.com चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) प्रतीक सिंग (Pratik Singh) म्हणाले की, तंत्रज्ञान कंपन्यांना (Technology Companies) आता जागतिक स्तरावर विस्तार करायचा आहे आणि त्यासाठी त्यांना भांडवलाची गरज आहे. त्यामुळे ते आयपीओ मार्गे निधी उभारण्यास प्राधान्य देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()