एचडीएफसी सिक्युरिटीज एसआयपी कॅल्क्युलेटर तुम्हाला हे समजावण्यास मदत करतो.
तुम्हाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच म्युच्युअल फंडात SIP मध्ये गुंतवणूक (Investment) करायची असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसआयपीमध्ये (SIP) दर महिन्याला पैसे गुंतवणे चांगले आहे की एकरकमी गुंतवणूक करणे चांगले याचा विचार होणे गरजेचे आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज एसआयपी कॅल्क्युलेटर तुम्हाला हे समजावण्यास मदत करतो.
मासिक गुंतवणूक
जर तुम्हाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही एचडीएफसी सिक्युरिटीज एसआयपी (Systematic Investment Plan) कॅल्क्युलेटरच्या मदतीने परतावा जाणून घेऊ शकता. जर तुम्ही मॉडरेट गुंतवणूकदार असाल आणि दरमहा 10 हजार रुपये एसआयपीमध्ये 10 वर्षांसाठी गुंतवले तर दहा वर्षांनंतर तुम्हाला एकूण 28,90,677 रुपये मिळतील.
एकरकमी गुंतवणूक कॅलक्युलेशन
तुम्ही म्युच्युअल फंडाचे मॉ़डरेट गुंतवणूकदार असाल, तर 10 वर्षांसाठी 6 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करा, तर तुम्हाला एकूण 28,84,196 रुपये मिळतील. त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्ही 10 लाख रुपये एकरकमी गुंतवता, तेव्हा 10 वर्षानंतर तुम्हाला एकूण 48,06,993 रुपये मिळतील.
गुंतवणुकीतही धोका
एसआयपी हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला थेट बाजाराचा धोका पत्करावा लागत नाही. त्याच वेळी, परतावा देखील पारंपारिक उत्पादनापेक्षा जास्त आहे. पण, यातही धोका आहे. त्यामुळेच गुंतवणूक करताना इन्कम, टारगेट, आणि रिस्क या सगळ्याचा विचार करुनच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.