मुंबई : काही वर्षांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने जनधन योजनेंतर्गत गरीब वर्गातील लोकांची खाती मोठ्या प्रमाणावर उघडली होती. सरकारच्या या मोहिमेशी मोठ्या संख्येने लोक जोडले गेले. जर तुमचे जन धन खाते उघडले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे.
सरकारने आता जन धन खातेधारकांसाठी अशी योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिली जाईल. एवढेच नाही तर वार्षिक आधारावर 36,000 रुपये पेन्शन म्हणून दिले जातील. मोदी सरकार चालवत असलेल्या या योजनेचे नाव आहे पीएम श्रम योगी मानधन योजना, ज्यात सहभागी होऊन तुम्हीही मोठा फायदा घेऊ शकता.
योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय
18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती केंद्र सरकारच्या पीएम श्रम योगी मानधन योजनेत सहभागी होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती 60 वर्षांची होते, तेव्हा या योजनेचे पैसे त्याच्याकडे हस्तांतरित केले जातात. यामध्ये वर्षाला 36,000 रुपये ट्रान्सफर केले जातात.
असंघटित क्षेत्रात काम करणा-या लोकांना या योजनेचा लाभ मिळतो, रस्त्यावर विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरकामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, तुमचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.
ही कागदपत्रे लागतील
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमचे जन धन खाते असणे देखील आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे बचत खाते तपशील देखील सबमिट करावे लागतील. सरकार जन धन खातेधारकांसाठी या योजनेशिवाय अनेक योजना चालवत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.